औरंगाबादेत बनावट मतदान कार्ड बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोघा तरुणांना बेड्या

बनावट मतदान कार्ड बनवणाऱ्या टोळीचा औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. | Fake Voter id Card Racket

औरंगाबादेत बनावट मतदान कार्ड बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोघा तरुणांना बेड्या
Aurangabad Fake Id Accussed

औरंगाबाद : बनावट मतदान कार्ड बनवणाऱ्या टोळीचा औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शासकीय वेबसाईटवरून डाटा चोरी करून एका खाजगी वेबसाईटच्या साहाय्याने हे बनावट मतदान कार्ड बनवले जात होते. (Aurangabad police take a Action against two Accussed in Fake Voter id Card Racket)

याबाबत नायब तहसीलदार रेवणनाथ ताठे यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी तपासाची चाके फिरवत हरीश वाघमारे आणि नवनाथ शिंदे या दोघांना अटक केली आहे.

वरील दोन्ही आरोपी महा ई सेवा केंद्र आणि खाजगी कॉम्प्युटर सेंटरवर बसून बनावट मतदान कार्ड बनवत होते. पोलिसांनी या सेंटर वर छापा टाकून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आणि हेराफेरी करण्यासाठी वापरले जाणारे त्यांचे साहित्य ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, पुंडलिक नगर पोलिसांच्या या कामगिरीमुळे बनावट मतदान कार्ड बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. (Aurangabad police take a Action against two Accussed in Fake Voter id Card Racket)

धुळे पोलिसांची मोठी कारवाई, बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले असून, त्यांच्याकडून दोनशे रुपयांच्या बनावट नोटा तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.

बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा धुळे पोलिसांना सुगावा लागला होता. पोलिसांनी छापा मारत बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला गजाआड केलं आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथे बनावट नोटांचा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने संतोष गुलाब बेलदार राहणार कळमसरे यांच्या घरावर छापा टाकला.

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात त्यांना बनावट नोटा तयार करणारी यंत्रसामुग्री, त्याचबरोबर बनावट नोटा, संगणक, मोबाईल, बँकेचे पासबुक असा 48 हजार 307 रुपयांचा ऐवज आढळून आला. पोलिसांनी हा सगळा मुद्देमाल जप्त केला आहे.

(Aurangabad police take a Action against two Accussed in Fake Voter id Card Racket)

हे ही वाचा :

Pune Crime | पुणे बनावट नोटांप्रकरणी 6 आरोपींना 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा भांडाफोड, 47 कोटी 60 लाखांच्या बनावट नोटा जप्त

Published On - 2:51 pm, Thu, 11 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI