AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | कुटुंब देवदर्शनाला, भला मोठा ऐवज घरात, औरंगाबादेत अभियंत्याकडे 16 लाखांची घरफोडी

शहराला हादरवून सोडणाऱ्या या घरफोडीची लवकरात लवकर उकल करा, अशा सूचना पोलीस आयुक्ता डॉ. निखिल गुप्ता यांनी दिल्या आहेत. स्वामी यांच्या घरी सीसीटीव्ही नसले तरीही इतर ठिकाणच्या सीसीटीव्हींमध्ये आरोपी कैद झाले आहेत.

Aurangabad | कुटुंब देवदर्शनाला, भला मोठा ऐवज घरात, औरंगाबादेत अभियंत्याकडे 16 लाखांची घरफोडी
| Edited By: | Updated on: Apr 18, 2022 | 9:47 AM
Share

औरंगाबादः घरात सोने, चांदी हिऱ्याच्या दागिन्यांचा मोठा ऐवज असताना कोणतीही सुरक्षेची काळजी न घेणे औरंगाबादच्या अभियंत्याला (Aurangabad engineer) चांगलेच भोवले. सुट्यांमुळे देवदर्शनाचे नियोजन करून तीन दिवस हे कुटुंब देवदर्शनासाठी निघून गेले आणि नेमकी हीच संधी साधत चोरट्यांनी (Thieves) अभियंत्याचे घर फोडले. येथून 32 तोळे सोने आणि इतर मौल्यवान धातूंच्या वस्तूंवर डल्ला (Big Theft) मारला. 14 एप्रिलच्या रात्री सिडको एन-4 भागात ही घटना घडली. 15 एप्रिल रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. एवढ्या मोठ्या घरफोडीमुळे सिडको परिसर आणि औरंगाबादकरांना चांगलाच हादरा बसला आहे. त्यामुळे सुटीच्या दिवसातही घर सोडून जाण्याचं नियोजन करणाऱ्या नागरिकांच्या मनात धडकी भरली आहे.

काय घडला नेमका प्रकार?

शहरातील सिडको एन-4 कोप्पाक वेंकट नरसिंह स्वामी हे मूळचे विशाखापट्टणम येथील रहिवासी आहेत. ते शेंद्रा एमआयडीसीतील जॅकअप कंपनीत अभियंता आहेत. ते तीन वर्षांपासून पत्नी, मुलासह सिडकोतील एका घरात किरायाने राहतात. 14 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता स्वामी हे पत्नी आणि मुलासह उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेले. ते तीन दिवसांनी परतणार होते. जाताना त्यांनी मुख्य दरवाजाला कुलूप लावण्याऐवजी तो दरवाजा आतून बंद केला आणि पाठीमागील दरवाजाला बाहेरून कुलूप लावले. परंतु चोरांनी ते कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटाचे लॉक, ड्रॉवरचे लॉक तोडून घरात ऐवजावर डल्ला मारला. 15 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता घरमालकांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी स्वामी यांना माहिती देऊन माघारी बोलावून घेतले.

पाळत ठेवून चोरी?

स्वामी यांच्या घरी झालेली एवढी मोठी चोरी नक्कीच पाळत ठेवून झाल्याचे बोलले जात आहे. कारण त्यांनी जाताना समोरील दरवाजाला आतून बंद करत मागील दरवाजाला लॉक लावले. स्वामी यांच्या घराला सेफ्टी डोअर नव्हते. तसेच तेथे सीसीटीव्ही कॅमेरेही नाहीत. सेंट्रल लॉकदेखील नाही. शेजारी किंवा पोलीस ठाण्यातही त्यांनी देवदर्शनाला जाण्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नव्हती. ज्या दिवशी ते गावाला गेले, त्याच दिवशी त्यांच्या घरावर चोरट्यांनी डल्ला टाकला. त्यामुळे या घरावर नक्कीच पाळत ठेवून चोरट्यांनी घरफोडी केली असेल, असा पोलिसांना संशय आहे.

16 लाखांच्या ऐवजावर डल्ला, तपास पथके

शहराला हादरवून सोडणाऱ्या या घरफोडीची लवकरात लवकर उकल करा, अशा सूचना पोलीस आयुक्ता डॉ. निखिल गुप्ता यांनी दिल्या आहेत. स्वामी यांच्या घरी सीसीटीव्ही नसले तरीही इतर ठिकाणच्या सीसीटीव्हींमध्ये आरोपी कैद झाले आहेत. त्यामुळे लवकरच त्यांना पकडण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. हे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

इतर बातम्या-

Umran Malik : इंग्रजांचे षटकार खेचून देणार हा गोलंदाज, उमरानच्या धडाकेबाज कामगिरीचं शशी थरूरांकडून कौतुक

आधीच भारनियमनाची टांगती तलवार त्यात ग्राहकांच्या माथी अतिरिक्त बिलाचा भार

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...