AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणेशाच्या विसर्जनासाठी महानगरपालिकेची तयारी अंतिम टप्प्यात, विसर्जन विहिरींच्या स्वच्छतेची मोहीम जोरात

शहरातील 9 परंपरागत विहिरींतील गाळ काढणे व दोन कृत्रिम तलाव तयार करणे अशा एकूण अकरा ठिकाणची कामं सुरु आहे. सध्या जालाननगर येथील विहिरीचे काम पूर्ण झाले असून उर्वरीत कामही अंतिम टप्प्यात आहे. विहिरींच्या ठिकाणी रंगरंगोटीची कामंही सुरु आहेत.

गणेशाच्या विसर्जनासाठी महानगरपालिकेची तयारी अंतिम टप्प्यात, विसर्जन विहिरींच्या स्वच्छतेची मोहीम जोरात
अनंत चतुर्थी यावेळेस रविवारी आहे, त्याचा मुहूर्त, विधी, व्रत जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Sep 13, 2021 | 7:11 PM
Share

औरंगाबाद: गणेशोत्सवानंतर बाप्पांच्या मूर्ती विसर्जनाकरिता महापालिकेने (Aurangabad Municipal corporation ) यंदा आधीपासूनच विसर्जन विहिरींच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी काही विहिरींच्या स्वच्छतेचे काम अंतिम टप्प्यात असून काही ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. तरीही नागरिकांनी जवळच्याच कोणत्याही पाण्याच्या स्रोतात गणेशमूर्तींचे विसर्जन (Ganesh murti visarjan) करण्याऐवजी औरंगाबाद महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या विसर्जन विहिरींवरच मूर्तींचे विसर्जन करून सहकार्य करण्याच आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

9 परंपरागत विहिरी, दोन कृत्रिम तलाव

शहरातील विहिरी, तलाव यांमध्ये गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन होऊन, त्यामुळे पाणी प्रदुषण तसेच मूर्तींची विटंबना होऊ नये, या उद्देशाने महापालिकेतर्फे बाप्पांच्या मूर्ती विसर्जनासाठी विशेष सोय उपलब्ध करून दिली जाते. याअंतर्गत यावर्षी शहरातील 9 परंपरागत विहिरींतील गाळ काढणे व दोन कृत्रिम तलाव तयार करणे अशा एकूण अकरा ठिकाणची कामं सुरु आहे. यासाठी महापालिकेने 42 लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती सूत्रांकडून मिळली. सध्या जालाननगर येथील विहिरीचे काम पूर्ण झाले असून उर्वरीत कामही अंतिम टप्प्यात आहे. विहिरींच्या ठिकाणी रंगरंगोटीची कामंही सुरु आहेत.

मूर्ती विसर्जन कुठे करता येणार?

महापालिकेने गणेशाच्या मूर्ती विसर्जनासाठी नागरिकांकरिता विशेष सोय केली आहे. याअंतर्गत भावसिंगपुरा, औरंगपुरा, हडको एन13, संघर्षनगर, संतोषीमाता नगर, मुकुंदवाडी गाव, शिवाजीनगर, सातारा गाव, जालाननगर, ज्योती नगर (कृत्रिम तलाव), हर्सूल तलाव स्मृतिवन (कृत्रिम तलाव) आदी ठिकाणांचा समावेश आहे.

ऑनलाइन महालक्ष्मी स्पर्धा

शहरातील औरंगाबाद जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीतर्फे यंदा महालक्ष्मीच्या देखाव्यांसाठी ऑनलाइन स्पर्धा आयोजित केली आहे. याअंतर्गत 13 आणि 14 सप्टेंबर रोजी नागरिकांना आपल्या महालक्ष्मींच्या देखाव्यांचे फोटो, सजावटीचे छायाचित्र महासंघाने दिलेल्या फोन नंबरवर पाठवायचे आहेत. 9028355555 आणि 9921319121 या संपर्कक्रमांकावर नागरिक फोटो पाठवू शकतात. तरीही देखाव्यांच्या या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष अभिषेक देखमुख, कार्याध्यक्ष किशोर तुशळीबागवाले यांनी केले आहे.

इतर बातम्या- 

Aurangabad Waterfall | औरंगाबादच्या अजिंठा लेणीतील वाघूर धबधबा प्रवाहित, पाहा मनमोहक दृश्य

देशातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या अध्यक्षांची बैठक प्रथमच औरंगाबादेत होणार, काय आहे बैठकीचा अजेंडा?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.