AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैजापुरात कोरोनाची संख्या वाढतेय… पुढचे तीन महिने खबरदारी घेणे आवश्यक, महापालिकेचा इशारा

औरंगाबादच्या शेजारील जिल्हा अहमदनगरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमध्येही रुग्णांची संख्या जास्त दिसून येत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर आणि इतर ग्रामीण परिसरालाही धोका आहे.

वैजापुरात कोरोनाची संख्या वाढतेय... पुढचे तीन महिने खबरदारी घेणे आवश्यक, महापालिकेचा इशारा
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Sep 21, 2021 | 1:37 PM
Share

औरंगाबाद: मागील एक महिन्यापासून शहरातील कोरोना रुग्णांचे प्रमाण घटले होते. त्यामुळे गणेशोत्सवदेखील उत्साहात पार पडला. या काळात सार्वजनिक गणेशमंडळांच्या ठिकाणी नागरिकांनीही कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत गर्दी करणे टाळले. याच प्रकारे येणाऱ्या काळातही खबरदारी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. कारण दसरा- दिवाळी हा सणासुदीचा काळ म्हणजेच पुढील तीन महिन्यांत कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यातच जिल्ह्यातील वैजापूर आणि गंगापूरमध्ये (Gangapur and Vaijapur in Aurangabad) रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरवासियांनी योग्य ती खबरदारी बाळगण्याचे आवाहन महानगरपालिकेतर्फे (Aurangabad Municipal Corporation) करण्यात येत आहे.

नगर जिल्हा, तसेच वैजापूर-गंगापुरात प्रमाण जास्त

औरंगाबाद जिल्ह्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती प्रमाणास बसू शकतो, याबद्दलही प्रशासकीय यंत्रणा अंदाज बांधत आहे. कारण औरंगाबादचा शेजारचा जिल्हा असलेल्या अहमदनगरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमध्येही रुग्णांची संख्या जास्त दिसून येत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर आणि इतर ग्रामीण परिसरालाही धोका आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून शहराच्या तुलनेत वैजापूरमधील रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. त्याखालोखाल गंगापूरचा क्रमांक लागतो. म्हणूनच पुढील महिनाभर नागरिकांनी जास्त काळजी घेणे अपेक्षित आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

तिसरी लाट दीडपट अधिक धोकादायक ठरू शकते

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यातील सर्व महापालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकारी यांची 18 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली होती. त्यात मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी केंद्रीय अधिकाऱ्यांनी तिसऱ्या लाटेतील रुग्णांची संख्या दीडपटीने जास्त असण्याची शक्यता गृहित धरून तयारी करा, अशा सूचना महापालिकेला दिल्या.

70 मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा आवश्यक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचे हाल झाले. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरेसा साठा तयार ठेवण्याच्या सूचना केंद्रिय अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. दुसऱ्या लाटेतील स्थिती पाहता, शहरात कायम 70 मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध राहणे आवश्यक आहे. मेल्ट्रॉन, पदमपुरा कोव्हिड सेंटर, गरवारे कोव्हिड सेंटर आणि 784 ऑक्सिजन सिलिंडर असे एकूण 15 मेट्रिक टन ऑक्सिजनची सुविधा या महिनाअखेर होईल. तसेच घाटी, जिल्हा रुग्णालय, इतर खासगी रुग्णालयांचे मिळून 110 मेट्रिक टन ऑक्सिजन साठा शहरात कायम उपलब्ध असेल, अशी माहिती डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

इतर बातम्या- 

Corona Cases In India | देशात नव्या कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा घट, सक्रिय कोरोनाग्रस्तांमध्येही घसरण

नाशिक पुन्हा गॅसवर; कोरोना रुग्णांत वाढ, हजाराचा टप्पा ओलांडला

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ