Aurangabad | औरंगाबाद ते पुणे अंतर सव्वा तासात पार होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची काय घोषणा?

या मार्गावरून वाहने 140 किलोमीटर प्रतितास या वेगाने जाऊ शकतील. त्यामुळे प्रवाशांची वेळेत बचत होईल. या मार्गासाठी दहा हजार कोटी रुपयांची खर्च होईल, अशी माहितीही नितीन गडकरी यांनी दिली.

Aurangabad | औरंगाबाद ते पुणे अंतर सव्वा तासात पार होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची काय घोषणा?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 9:45 AM

औरंगाबादः सोलापूर-धुळे (Solapur Dhule highway) महामार्गाचं लोकर्पाण करण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी औरंगाबादकरांसाठी आणखी एक घोषणा करून सुखद धक्का दिला. औरंगाबाद ते पुणे (Aurangabad Pune) दरम्यान नव्या द्रुतगती महामार्गाची योजना त्यांनी सांगितली. दहा हजार कोटी रुपये खर्च करून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जाईल. तो पूर्ण झाल्यावर औरंगाबादहून पुण्याला जाण्यास फक्त सव्वा तास अंतर लागेल. सध्या या अंतरासाठी सहा तास लागतात. त्यामुळे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली ही घोषणा सत्यात उतरल्यानंतर औरंगाबाद आणि मराठवाड्याच्या प्रगतीच्या वाटा आणखी रुंदावणार हे निश्चित.

कसा असेल मार्ग?

औरंगाबाद ते पुणे हा मार्ग बीड, पैठण, अहमदनगर असा असेल. तसेच सध्या या मार्गाचा आराखडा पूर्ण झाल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. हा मार्ग द्रुतगती असल्याने यात कुठेही थांबा नसेल. तसेच या मार्गावरून वाहने 140 किलोमीटर प्रतितास या वेगाने जाऊ शकतील. त्यामुळे प्रवाशांची वेळेत बचत होईल. या मार्गासाठी दहा हजार कोटी रुपयांची खर्च होईल, अशी माहितीही नितीन गडकरी यांनी दिली.

शहरातील अखंड उड्डाणपुल कसा असेल?

2024 पर्यंत जिल्ह्यात 25 हजार कोटींची कामे सुरु करून पूर्ण करणार असल्याचा दावा नितीन गडकरी यांनी केला. शेंद्रा एमआयडीसी ते वाळूज असा 25 किलोमीटरचा पूल होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच मेट्रोसाठी दोन पूल होती. पहिला चिकलठाणा ते क्रांती चौक मार्गे रेल्वेस्टेशन हा 9 किमी लांबीचा असेल. तर दुसरा रेल्वेस्टेशन ते हर्सूल टी पॉइंटमार्गे सिडको बसस्टेशनपर्यंत 13 किमी लांबीचा असेल अशी घोषणा गडकरी यांनी केली.

धुळे-सोलापूर हायवेचे लोकार्पण

नितीन गडकरी यांच्या हस्ते शहरातील धुळे-सोलापूर हायवेचे लोकार्पण रविवारी झाले. औट्रम घाटात या महामार्गाचे काम थांबले आहे. घाटात काही ठिकाणी वन खात्याच्या अडचणी आहेत. पूर्ण बोगद्यासाठी खूप खर्च होऊ शकतो. त्यामुळे काही ठिकाणी बोहदा कर काही ठिकाणी चार पदरी रस्ता असा पर्याय सूचवण्यात आला आहे. चौसाळा, पाचोड, धारगाव, आडूळ, गेवराई, पांढरी आणि पिंपळगावातील अंतर्गत रस्ते एकाच वेळी विकसित केले जातील, असेही सांगण्यात आले आहे.

इतर बातम्या-

Pune : मशागतीविना शेती, तरुण शेतकऱ्याचा अभिनव उपक्रम पाहण्यासाठी परदेशी पाहुणे माळवाडीच्या शिवारात

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भाजपा आमदार रस्त्यावर

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.