Aurangabad | समर्थ नगरातील चोरीमागे Lady Mastermind, 40% वाट्याने दिली होती सुपारी, चौघांना अटक

Aurangabad | समर्थ नगरातील चोरीमागे Lady Mastermind, 40% वाट्याने दिली होती सुपारी, चौघांना अटक
समर्थनगरमधील चोरीचा कट रचना निंभोरे हिने रचल्याचे उघड
Image Credit source: TV9 Marathi

या प्रकरणी पोलिसांनी रचना निंभोरे, नदीम खान, विवेक गंगावणे, रोहित बोर्डे या चौघांना अटक केली आहे. 20 दिवसांपूर्वी या चोरीचा कट रचला गेल्याचं पोलिसांच्या चौकशीतून उघड झालं.

मंजिरी धर्माधिकारी

|

Mar 18, 2022 | 9:10 AM

औरंगाबादः मोहटाई रिअल इस्टेटचे मालक अशोक शंकरराव पाटील यांच्या समर्थनगरातील (Samartha nagar Aurangabad)कार्यालयात झालेल्या जबरी चोरीचा (Big theft) उलगडा 12 तासांत झाला असून यामागे लेडी मास्टर माइंड असल्याचं समोर (Police investigation) आलं आहे. रचना तुळशीराम निंभोरे या 36 वर्षीय तरुणीने दोन तरुणांच्या मदतीने ही चोरी केल्याचे उघड झाले आहे. या चोरीत 13 तोळे सोने घेऊन चोर पळाले होते. पोलिसांनी 12 तासांच्या आतच यातील मास्टरमाइंडसह तिच्या साथीदारांना जेरबंद केले. या तरुणीने 40 टक्के वाटा देण्याच्या अमिषावर तरुणांना चोरीत सहभागी करून घेतले होते, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर आली आहे. 16 मार्च रोजी बुधवारी दुपारच्या वेळी ही घटना घडली होती.

काय घडली होती घटना?

बुधवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास अशोकराव पाटील यांनी लेडी मास्टरमाइंड रचनाने जमिनीसंदर्भात बोलायचे आहे, असा कॉल केला. दोन वाजता पाटील यांच्या कार्यालयात पोहोचल्यावर तिने वेरूळ येथील रस्त्यालगतच्या जमिनीची चौकशी सुरु केली. त्यानंतर काही मिनिटातच वीस ते पंचवीस वर्षे वयाचे दोन तरुण पाटील यांच्या दालनात घुसले. त्यांनी रचनाशी ओळख नसल्याचे दाखवत तिला बाहेर जाण्यास सांगितले. ती बाहेर जाताच पाटील यांना जोरदार मारहाण सुरु केली. यात पाटील कोसळले. त्यांच्या तोंडावर पट्टी तर हात-पाय दोरीने बांधण्यात आले. गळ्यातील सोन्याच्या सहापैकी तीन साखळ्या तोडल्या. दोन तुटून खाली पडल्या होत्या. दरम्यान, तोंड बांधण्यापूर्वी पाटील यांनी आरडाओरड केली होती. ते ऐकून आजूबाजूचे काही जण धावून आले. त्यांना धमकावून लुटारूंनी तेथून पळ काढला होता. क्रांती चौक पोलीस स्टेशनमधील पथकाने घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरु केला.

12 तासांत आरोपी पकडले

या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने आधी रचनावरच संशय घेतला. एवढी घटना होत असताना ती अचानक गायब कशी झाली, असा प्रश्न उपस्थित झाला. रचनानेही तेथून पळ काढत पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी औरंगपुऱ्याची वाट धरली. काही अंतरानंतर मोबाइल बंद केला. मात्र बुधवारी सहा वाजेपर्यंत पोलिसांनी रचनाला पकडले. तसेच तिच्या साथीदारांनाही फोन करून बोलावून घेण्यास सांगितले. सिग्मा रुग्णालयाजवळच्या मैदानावर साथीदार आल्यानंतर त्यालाही पकडले. तर रात्रीतून आणखी तीन साथीदारांना पकडण्यात आले.

चौघांना अटक

या प्रकरणी पोलिसांनी रचना निंभोरे, नदीम खान, विवेक गंगावणे, रोहित बोर्डे या चौघांना अटक केली आहे. 20 दिवसांपूर्वी या चोरीचा कट रचला गेल्याचं पोलिसांच्या चौकशीतून उघड झालं. इस्टेट ब्रोकर असल्याचा दावा करणाऱ्या लेडी मास्टरमाइंड रचनाला आई-वडील नाहीत. मागील वर्षी भावाचे निधन झाल्याचे तिने सांगितले. कामानिमित्त पाटील यांची तिची भेट झाली होती. त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने पाहून तिने 20 दिवसांपूर्वी चोरीचा कट रचला होता. नदीम हा रिक्षाचालक असून तोही जमीन खरेदी विक्रीची कामे करतो. यातील रोहित बोर्डे याचा तर बुधवारी बारावीचा पेपर होता. मात्र पैसे मिळण्याचे आमिष दाखवल्याने पेपर बुडवून तो चोरीच्या कटात शामिल झाला होता.

इतर बातम्या-

Happy Holi 2022 : कोकणात शिमगोत्सवाला उत्साहात सुरूवात, ढोल ताशांच्या गजरात मंदिराचा परिसर दणाणला

साऊथचा श्रीवल्ली विसरा,मराठीतली ‘पुष्पावल्ली’ पाहा…


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें