AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐपत नसेल तर आम्ही बिल देऊ! Aurangabad मनपाने शिवजयंतीचे बिल थकवले, आयुक्तांना कुणी दिला इशारा?

विनोद पाटील यांनी महापालिकेला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आगामी शिवजयंतीदेखील महानगर पालिकेने थाटात साजरी करावी. मनपाची तशी ऐपत नसेल तर स्पष्ट सांगावे. शिवभक्त म्हणून मी महापालिकेचे शिवजयंतीचे मागचे बिल देण्यास तयार आहे.

ऐपत नसेल तर आम्ही बिल देऊ! Aurangabad मनपाने शिवजयंतीचे बिल थकवले, आयुक्तांना कुणी दिला इशारा?
मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांचा औरंगाबाद मनपाला इशारा
| Updated on: Feb 11, 2022 | 1:12 PM
Share

औरंगाबादः आगामी शिवजयंतीच्या निमित्ताने औरंगाबादेत एकिकडे जोरदार तयारी सुरु आहे. शहरात अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला शिवरायांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) मोठ्या थाटा-माटात क्रांती चौकात उभा ठाकला आहे. लवकरच याचे अनावरण केले जाईल. मात्र मागील वर्षातील शिवजयंती उत्सवाचा एक वेगळाच वाद समोर आला आहे. महापालिकेने क्रांती चौकातील शिवजयंती उत्सावचे (Shiv Jayanti) साउंड अँड डेकोरेशनचे बिल दोन वर्षांपासून थकवले असून त्यामुळे आता संबंधित ठेकेदाराने कुटुंबासह उपोषणाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी महापालिका आयुक्तांना एक पत्र लिहिले आहे. या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिकेची ऐपत नसेल तर शिवभक्त म्हणून मी शिवजयंतीचे मागील बिल देण्यास तयार आहे, असे विनोद पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. आता महापालिका यावर काय कृती करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनपाने कुणाचे बिल थकवले?

विनोद पाटील यांनी गुरुवारी मनपाला सदर पत्र दिले. त्यात म्हटले आहे की, शहरात दरवर्षी शिवजयंती उत्साहात साजरी होते. त्यासाठी सजावट साउंड सिस्टीम आदी कार्यक्रमाचा खर्च महापालिका प्रशासन करत असते. मात्र दोन-दोन वर्षे लोकांची बिले दिली जात नाहीत. याबाबत संबंधित ठेकेदारानेच पत्र लिहून मला हकीगत कळवली आहे. संतोष चादरे असे या ठेकेदाराचे नाव असून त्यांनी 19 फेब्रुवारी 2020 रोजी छत्रपती शिवजयंती निमित्त सर्व डेकोरेशन, लाइट, साउंड व्यवस्थेचे काम केले. या कामासाठी लागणाऱ्या खर्चाची कल्पना महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना दिली होती. लेखी कोटेशन आधीच महापालिकेत जमा केले होते. तरीही 2 वर्षे होऊनही त्यांना कामाचा मोबदला मिळाला नाही. महापालिकेकडे वायफळ गोष्टींवर खर्च करण्यासाठी पैसा आहे, पण महाराजांच्या जयंतीला अशा प्रकारे गालबोट लागत असेल तर आम्हाला ते सहन होणार नाही, मनपाने मागचे बिल तातडीने द्यावे..’ असा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे.

ऐपत नसेल तर मी बिल भरतो- विनोद पाटील

विनोद पाटील यांनी महापालिकेला लिहिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, आगामी शिवजयंतीदेखील महानगर पालिकेने थाटात साजरी करावी. मनपाची तशी ऐपत नसेल तर स्पष्ट सांगावे. शिवभक्त म्हणून मी महापालिकेचे शिवजयंतीचे मागचे बिल देण्यास तयार आहे. आता महापालिका यावर काय कृती करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्या-

Karnataka Hijab वादाचे Amravati मध्ये पडसाद, Muslim समाज जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा

आधी लडाखला चीनच्या तावडीतून स्वतंत्र करा, गोव्यावर नंतर बोलू; राऊतांचा पंतप्रधानांना टोला

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.