युवासेनेच्या संवाद मेळाव्यात गर्दी जमवणे भोवले, औरंगाबादेत आयोजकांवर गुन्हा दाखल

दत्ता कानवटे

| Edited By: |

Updated on: Aug 14, 2021 | 4:44 PM

गर्दी जमवून कोरोना प्रतिंबधक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी युवासेनेच्या संवाद मेळाव्याचे आयोजक शिवसेना नेते राजेंद्र जंजाळ आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवासेनेच्या संवाद मेळाव्यात गर्दी जमवणे भोवले, औरंगाबादेत आयोजकांवर गुन्हा दाखल
aurangabad-sanvad-yatra

औरंगाबाद : गर्दी जमवून कोरोना प्रतिंबधक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी युवासेनेच्या संवाद मेळाव्याचे आयोजक शिवसेना नेते राजेंद्र जंजाळ (Rajendra Janjal) आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मेळाव्यात युवासेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई सहभागी झाले होते. जवाहर नगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. (case registered against Rajendra Janjal in Aurangabad Jawahar Police Station for violating Corona rules in Yuvasena Sanvad Yatra)

राजेंद्र जंजाळ, पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

शिवसेनेतर्फे युवा संवादाच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधला जातोय. औरंगाबादेतही 13 ऑगस्ट रोजी अशाच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वरुण सरदेसाई यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात युवासेनेचे पदाधिकारी तसेच इतर कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. याच कारणामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. औरंगाबादेतील संवाद मेळावा राजेंद्र जंजाळ यांनी आयोजित केला होता.

गर्दी झाल्यास आमच्याविरोधात गुन्हा दाखल करा

औरंगाबादेत प्रत्यक्ष कार्यक्रम पार पडण्याआधी गर्दी झाल्यास आमच्याविरोधात गुन्हा दाखल केला तरी आमची हरकत नसेल, असे वक्तव्य सरदेसाई यांनी केले होते. तसेच कार्यक्रमात कोणतीही गर्दी होऊ देणार नाही अशी हमी दिली होती. प्रत्यक्षात मात्र कार्यक्रमात लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले होते. या सर्व प्रकारानंतर पोलीस प्रशासन कायद्याप्रमाणे कारवाई करणार का ? असा प्रश्न विचारला जात होता. त्यानंतर आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मराठवाड्यात युवा सेनेची ताकत वाढत आहे

दरम्यान, 13 ऑगस्टच्या कार्यक्रमात वरूण सरदेसाई यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते. यावेळी बोलताना वरूण सरदेसाई यांनी मराठवाड्यात युवा सेनेची ताकत वाढत असल्याचं म्हटलं होतं. त्याचबरोबर कोविड काळात विरोधी पक्षांनी अनेक अडचणी निर्माण करण्याचं काम केलं. मात्र उध्दव ठाकरे यांनी हिंमत न हारता कोरोनाकाळात चांगलं काम केलं. त्यामुळे महाराष्ट्र सुरक्षित राहिला, असे सरदेसाई म्हणाले होते.

इतर बातम्या :

Video: गजानन काळेंच्या पत्नीवर सेटलमेंटसाठी दबाव? चित्रा वाघ म्हणतात, हे काय चाललंय राज्यात?

पोस्टाने तक्रार दिलेली महिला पोलीस ठाण्यात पोहोचली, संजय राठोडांच्या अडचणी वाढणार?

मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपची अध्यातिक आघाडी पुन्हा आक्रमक, घृष्णेश्वर मंदिरासमोर आंदोलनाचा इशारा

(case registered against Rajendra Janjal in Aurangabad Jawahar Police Station for violating Corona rules in Yuvasena Sanvad Yatra)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI