AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणी घर देता का घर… अन् चक्क ‘नटसम्राट’ छगन भुजबळ स्टेजवर अभिनय करतात तेव्हा…

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवानिमित्ता नांदेडमध्ये त्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाणही उपस्थित होते.

कुणी घर देता का घर... अन् चक्क 'नटसम्राट' छगन भुजबळ स्टेजवर अभिनय करतात तेव्हा...
chhagan bhujbal Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 19, 2023 | 3:35 PM
Share

नांदेड : महाराष्ट्रात फार थोडे नेते आहेत की जे आपल्या अमोघ वक्तृत्वशैलीने आणि खुसखुशीत भाषणाने मैदान मारून नेतात. या नेत्यांचं भाषण ऐकणं म्हणजे एक पर्वणी असते. खुमासदार शैली, कोट्या, चिमटे, टोप्या उडवणे, संदर्भ, माहितीचा खजाना, किस्से आणि गौप्यस्फोट अशा मसाल्यांनी कुटून भरलेलं असं या नेत्यांचं भाषण असतं. अशा मैदान मारणाऱ्या नेत्यांपैकी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे त्यापैकीच एक. भुजबळांचं भाषण म्हणजे दुधात साखर असंच असतं. त्याचं कारणही तसंच आहे. भुजबळांच्या भाषणात किस्से, कोट्या, चिमटे, टोमणे, संदर्भ, आठवणी सर्व काही असतच, पण त्याही पेक्षा भुजबळांचं भाषण हे साभिनय असतं. त्यांच्या भाषणात केवळ शब्द नसतात. तर त्या शब्दांना भावना असतात आणि त्याला असते अभिनयाची जोड. त्यामुळे भुजबळांचं भाषण न गाजतं तर नवलं. आज नांदेडकरांना तर भुजबळांचा अभिनय पाहण्याची पर्वणीच लाभली. अन् श्रोत्यांनी भुजबळांचा अभिनय डोक्यावर घेतला.

छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवानिमित्ता नांदेडमध्ये त्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी भुजबळांची प्रकट मुलाखत झाली. ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी भुजबळांची मुलाखत घेतली. यावेळी बर्दापूरकर यांनी लातूरच्या सभेचा किस्सा सांगितला. शिवराज पाटील चाकूरकर यांची ही सभा होती. ऊन खूप पडलं होतं. पण तरीही लोकं थांबून होते. त्यावेळी राजीव गांधी यांची हत्या झालेली होती. या सभेला भुजबळ आले होते. या सभेत भुजबळांनी भाषण केलं. राजीव गांधी यांची हत्या आणि त्यांच्या अंत्यविधीचं वर्णन करणारं भुजबळांचं ते भाषण होतं. त्यांनी या अंत्यविधीचं प्रचंड प्रभावी वर्ण केलं. लोकांच्या डोळ्यात अक्षरश: अश्रू उभे राहिले. सभा संपल्यावर लोक भारावलेल्या स्थित बाहेर पडले होते, असं बर्दापूरकर म्हणाले.

सादरीकरण मंत्रमुग्ध करणारं

भुजबळांच्या भाषणात केवळ शब्द नसतात, अभिनय असतो. भावना असतात. त्यांचं सादरीकरण मंत्रमुग्ध करणारं असतं, असंही बर्दापूरकर यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी वि. वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राट नाटकातील कुणी घर देता का घर… या संवादावरील छगन भुजबळ यांचा परफॉर्मन्स पाहिला होता, असं बर्दापूरकर यांनी सांगितलं आणि तोच संवाद पुन्हा साभिनय सादर करण्याची विनंती त्यांनी भुजबळांना केली. त्यांनी भुजबळांकडे स्क्रिप्टही सोपावली.

कुणी घर देता का घर…

नटसम्राटचा संवाद हातात आल्यानंतर भुजबळांनी रुमालाने आधी तोंड पुसलं. नंतर गळ्यातील मफलर काढली. आधी स्क्रिप्टवरून नजर फिरवली. अन् त्यानंतर नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर यांच्या भूमिकेत शिरून छगन भुजबळ यांनी संवाद फेक सुरू केली. कुणी घर देता का घर?… एका तुफानाला कुणी घर देता का?… एक तुफान भिंतीवाचून, छपरावाचून, माणसाच्या मायेवाचून, देवाच्या दयेवाचून जंगलाजंगलात हिंडतय… जिथून कुणी उठवणार नाही अशी एक जागा धुंडतय… कुणी घर देता का घर?… छगन भुजबळ नटस्रमाटमधील संवाद म्हणत होते. संवाद म्हणताना कधी पॉझ घेत होते… कधी त्यांच्या आवाजात कंपन जाणवत होतं… कधी स्वर उंच होत होते… कधी स्वर खाली जात होते… हे संवाद म्हणताना चेहऱ्यावरचे भाव बदल होते…हात थरथरताना दिसत होते… जणून काही भुजबळ नव्हे तर समोर नटसम्राटमधील 80 वर्षाचे गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकरच संवाद म्हणत असल्याचं जाणवत होतं…

भुजबळ बोलत असताना पिन ड्रॉप सायलन्स झाला होता… प्रेक्षक कानात प्राण ओतून ऐकत होता… मध्येच दाद देत होता… अन् जेव्हा संवाद संपला तेव्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. काहींनी तर उभं राहून भुजबळ यांच्या या लाइव्ह परफॉर्मन्सला दाद दिली…भुजबळांच्या साभिनयानेच कार्यक्रमाची सांगताही झाली.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.