AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! औरंगाबादेत डॉ. भागवत कराड यांच्या घराजवळ शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन, पोलिसांनी रोखलं!

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी भाजप कार्यकर्तेही जमले होते.. क्रांती चौकातून पैठण रोडकडे जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी वाटेतच रोखलं तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यातच ठि्यया आंदोलन करत पंतप्रधानांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

मोठी बातमी ! औरंगाबादेत डॉ. भागवत कराड यांच्या घराजवळ शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन, पोलिसांनी रोखलं!
औरंगाबादेत काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनं
| Edited By: | Updated on: Feb 12, 2022 | 1:12 PM
Share

 औरंगाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वक्तव्याविरोधात आज औरंगाबादमधील काँग्रेस (Aurangabad congress) कार्यकर्त्यांनी मोठं आंदोलन केलं. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांच्या घरासमोर आंदोलन करणार असा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी काल दिला होता. त्यानुसार, आज शनिवारी सकाळीच शेकडो कार्यकर्ते क्रांती चौक येथे जमले होते. त्यानंतर हा मोर्चा केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या घराकडे निघाला. मात्र पोलिसांनी त्यांना रस्त्यात अडवलं. क्रांती चौकातच कार्यकर्त्यांना रोखल्यामुळे तेथेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी भाजप कार्यकर्तेही जमले आहेत. क्रांती चौकातून पैठण रोडकडे जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी वाटेतच रोखलं तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यातच ठि्यया आंदोलन करत पंतप्रधानांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

डॉ. कराड यांच्या घरी भाजप कार्यकर्ते

दरम्यान, काल काँग्रेसने भाजपविरोधात हे निषेध आंदोलन करण्याचं घोषित केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनीही याचा विरोध करण्याचं ठरवलं. त्यानुसार, डॉ. भागवत कराड यांच्या घरी शहरातील सर्व भाजप नेते आणि कार्यकर्ते जमले होते. काँग्रेसच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्तेही शहरात एकवटले. मात्र भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने येऊ नये, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला आहे. तरीही काँग्रेसच्या मोठ्या जमावानं क्रांती चौकात मोठ-मोठ्याने घोषणाबाजी सुरु केली.

पंतप्रधानांनी माफी मागण्याची मागणी

पंतप्रधान नरेंद्री यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत बोलताना देशातील कोरोनाचा प्रसार होण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर काँग्रेस पक्षातून यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्ते भाजप नेत्यांच्या घराबाहेर किंवा कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. अनेक ठिकाणी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आलेले दिसून आले.

इतर बातम्या-

गोव्यात रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या I-PAC संस्था परिसरात छापेमारी, गांजा जप्त, एकाला अटक

विषप्राशन केलेले दीर-भावजय, भर रस्त्यात घट्ट मिठी, जालना रोडवर अखेर तडफडत कोसळले, औरंगाबादेत काय घडलं?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.