Corona: शहराच्या प्रवेशद्वारांवर पुन्हा चेकिंग! नगरमधील फैलावामुळे औरंगाबाद गॅसवर!

लॉकडाऊनच्या काळात शहरातील प्रमुख मार्गावर आरोग्य विभागाच्या चेकपोस्ट उभारण्यात आल्या होत्या. आताही चिकलठाणा जवळील केंब्रिज चौक, हर्सूल टी पॉइंट, नगर नाक्यावरील गोलवाडी फाटा, कांचनवाडी, दौलताबाद रस्त्यावरील शरणापूर फाटा तसेच झाल्टा फाटा येथे चेकपोस्ट उभारण्यात येणार आहे.

Corona: शहराच्या प्रवेशद्वारांवर पुन्हा चेकिंग! नगरमधील फैलावामुळे औरंगाबाद गॅसवर!
प्रातिनिधीक छायाचित्र

औरंगाबाद: अहमदनगर या औरंगाबादच्या (Aurangabad)  शेजारी जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढला असून तेथील तब्बल 61 गावांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आले आहे. नगरमधील रुग्णसंख्या (Ahmednagar corona) लक्षात घेता औरंगाबाद जिल्हाप्रशासनही सतर्क झाले असून शहरात येणाऱ्या महामार्गांवर पुन्हा एकदा तपासणी नाके उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण (Sunil Chavan) यांनी दिली.

औरंगाबादेत तातडीची बैठक

अहमदनगर येथील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी सोमवारी एक तातडीची बैठक घेतली. यात आरोग्य विभाग, पोलीस, महानगर पालिका यासह इतर विभागांच्या प्रमुखांची उपस्थिती होती. या बैठकीत औरंगाबादेत येणाऱ्या सहा प्रवेशद्वारावर तपासणी नाके पुन्हा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कोरोना नियमावलीचे कठोर पालन करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

गर्दी नियंत्रणाची सूत्रे पोलिसांकडे

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा गर्दी होण्याचा धोका आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी शहरात येत असतात. त्यामुळे पोलीस विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची तैनाती, विशेष टीमचे गठन आणि धार्मिक स्थळांजवळ पोलिसांची अधिक कुमक ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. शहरातील तसेच ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्येही गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना पोलीस विभागाला देण्यात आल्या आहेत.

बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग

औरंगाबादमध्ये बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची शहरात येण्यापूर्वी स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. तसेच नगरहून येणाऱ्या प्रवाशांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत का, याचीही चौकशी करण्यात येणार आहे. याद्वारे शहरात संसर्ग पुन्हा वाढणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

सहा ठिकाणी चेक पोस्ट

लॉकडाऊनच्या काळात शहरातील प्रमुख मार्गावर आरोग्य विभागाच्या चेकपोस्ट उभारण्यात आल्या होत्या. आताही चिकलठाणा जवळील केंब्रिज चौक, हर्सूल टी पॉइंट, नगर नाक्यावरील गोलवाडी फाटा, कांचनवाडी, दौलताबाद रस्त्यावरील शरणापूर फाटा तसेच झाल्टा फाटा येथे चेकपोस्ट उभारण्यात येणार आहे.

सोमवारी औरंगाबादेत 13 नवे कोरोनाबाधित

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी 13 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या 153 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

इतर बातम्या- 

Aurangabad: महापालिका उभारणार सात चार्जिंग स्टेशन अन् ई-कारही खरेदी करणार, नव्या पदाधिकाऱ्यांसाठी पालिकेची तयारी

Aurangabad gold: सोने-चांदी स्वस्तच, मुहूर्तही खास, गुंतवणुकीची संधी सोडू नका, वाचा औरंगाबादचे भाव 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI