गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आता इलेक्ट्रिक वाहनांचाही अभ्यास, ऑटोमोटिव्ह मेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा अंतर्गत विषय

शासकीय तंत्रनिकेतन येथील अॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन ऑटोमोटिव्ह मेक्ट्रॉनिक्स या पदविका अभ्यासक्रमासाठी येत्या 29 जानेवारी रोजी प्रवेश चाचणी घेतली जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात अभ्यासक्रमाला सुरुवात होईल.

गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आता इलेक्ट्रिक वाहनांचाही अभ्यास, ऑटोमोटिव्ह मेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा अंतर्गत विषय
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, औरंगाबाद

औरंगाबादः शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आणि मर्सिडिज बेंझ यांच्या सहकार्यातून आता विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रमात आता इलेक्ट्रिक वाहनांचा विषयही घेता येण्याची संधी मिळणार आहे. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात यावर्षीपासून ‘अॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन ऑटोमोटिव्ह मेक्ट्रॉनिक्स’ या पदविका अभ्यासक्रमात यंदा इलेक्ट्रिकल वाहनांचा समावेश करण्यात आला आहे.

एक वर्षाचा डिप्लोमा

हा डिप्लोमा एक वर्ष कालावधीचा आहे. तंत्रशिक्षण सहसंचालक आणि मर्सिडिज बेंझ यांच्यात 2024 पर्यंत हा करार झाला आहे. हा पदविका अभ्यासक्रम सुरु होऊन 12 वर्षे झाली असून नवीन बॅचच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या केंद्रातून दर्जेदार शिक्षण घेऊन आतापर्यंत 233 प्रशिक्षणार्थी बाहेर पडले आहेत. येथील प्रशिक्षणार्थी नामांकित कार कंपन्यांत जगभरात कार्यरत आहेत. प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिकल वाहने ही काळाची गरज असून त्यांचे उत्पादनही आता मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. या पार्श्वभूमीवर ऑटोमोटिव्ह मॅक्ट्रॉनिक्स या पदविका अभ्यासक्रमात त्यांचाही समावेश करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

29 जानेवारी रोजी प्रवेश चाचणी

शासकीय तंत्रनिकेतन येथील अॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन ऑटोमोटिव्ह मेक्ट्रॉनिक्स या पदविका अभ्यासक्रमासाठी येत्या 29 जानेवारी रोजी प्रवेश चाचणी घेतली जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात अभ्यासक्रमाला सुरुवात होईल. या प्रवेशाबाबतची माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

इतर बातम्या-

भाजपाला धक्का? मुंबै बँकेच्या अध्यक्षपदावरून प्रवीण दरेकरांना व्हावं लागेल पायउतार

Mumbai Bank Election: मुंबई बँक निवडणुकीत दरेकरांना झटका? अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार!


Published On - 7:00 am, Fri, 14 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI