आरं सोन्यालाही लागली कळsss सराफा बाजार आज आणखी कोसळला, वाचा औरंगाबादचे भाव

कालच औरंगाबादमधल्या दरांनी 46 हजार रुपयांची पातळी ओलांडली होती. आज म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी मंगळवारी 22 कॅरेट सोन्याचे दर 45,850 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर चांदीच्या दरातही फारशी सुधारणा दिसून आली नाही.

आरं सोन्यालाही लागली कळsss सराफा बाजार आज आणखी कोसळला, वाचा औरंगाबादचे भाव
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबाद: गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसानं मराठवाड्यात थैमान घातले आहे. मात्र या आभाळाच्या संकटासोबतच सराफा बाजारातही (Sarafa market) प्रचंड हालचाली सुरु आहेत. सोन्या-चांदीचे भाव आजही कोसळले आहेत. सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या दरांनी (Gold Price) जी घसरणीची वाट धरली आहे, ती अजूनही कायमच आहे. काल सोन्याच्या दरांनी महिनाभरातील निचांकी पातळी गाठली होती. आज मंगळवारी 28 सप्टेंबर रोजी सोन्याचे भाव  त्याहूनही कमी नोंदले गेले.  त्यामुळे सोन्यात गुंतवणूक (Investment in gold) करण्याची इच्छा असणाऱ्यांनी हीच संधी साधावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

काय आहेत औरंगाबादचे भाव?

सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याने या महिन्यातील निचांकी पातळी गाठली आहे. कालच औरंगाबादमधल्या दरांनी 46 हजार रुपयांची पातळी ओलांडली होती. आज म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी मंगळवारी 22 कॅरेट सोन्याचे दर 45,850 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर चांदीच्या दरातही फारशी सुधारणा दिसून आली नाही. काल आणि आजही चांदीचे दर एक किलोमागे 63,500 रुपये एवढे नोंदले गेले. मात्र आज शहरात पावसाची संततधार सुरु असल्यामुळे ग्राहकांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले, अशी माहिती औरंगाबादच्या सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी दिली.

गोल्ड हॉलमार्क युनिक आयडी म्हणजे काय?

HUID (गोल्ड हॉलमार्क युनिक आयडी) हा एक नंबरसारखा आहे, जो तुमच्या आधार किंवा पॅन सारखा असू शकतो. HUID अंतर्गत प्रत्येक दागिन्यांना एक विशिष्ट ओळख क्रमांक दिला जातो. हा आयडी सांगेल की, दागिने कोठून विकले गेले आणि विकल्यानंतर ते कोणाच्या हातात गेले. कोणत्या सोनाराने हे दागिने विकले, कोणत्या खरेदीदाराने ते विकत घेतले, ते दागिने काही लॉकरमध्ये ठेवले होते, ते वितळले गेले आणि पुन्हा दागिने बनवले गेले आणि पुढे विकले गेले. ही सर्व माहिती त्या HUID मध्ये नोंदवली जाईल.

यामागील उद्देश्य काय?

सरकारला सर्व प्रकारचे दागिने किंवा सोन्याची विटा, बिस्किटे किंवा बार शोधायचे आहेत, जेणेकरून देशात सोने कोठून येत आहे हे कळू शकेल. सोन्याचा सर्वात मोठा वापर तस्करीसाठी होतो आणि त्यातून काळा पैसा तयार करणे खूप सोपे जाते. HUID च्या माध्यमातून सरकारला सोन्याचा खरा विक्रेता कोण आहे हे कळू शकेल. जर विक्रेता ओळखला गेला तर फसवणूक होण्याची शक्यता कमी आहे. यासह ग्राहकांना शुद्ध सोने मिळेल आणि सरकारदेखील त्यावर कमाई करेल. सोन्याच्या तस्करीच्या नावाखाली करचोरी थांबवली जाईल.

सोनार विरोध कशासाठी?

पहिल्या दृष्टीक्षेपात ज्वेलर्स किंवा सोनार सरकारच्या हॉलमार्किंग (गोल्ड हॉलमार्क युनिक आयडी) चा थेट विरोध करत असल्याचे दिसत नाही. जर तुम्ही थेट विरोध केला, तर लोक म्हणतील की त्यांनाही भ्रष्टाचाराला प्रोत्साहन द्यायचे आहे. हेच कारण आहे की, देशभरात HUID विरुद्ध प्रचार होत आहे. सुवर्णकार म्हणतात की, सध्या देशात हॉलमार्किंगसाठी पुरेशी पायाभूत सुविधा उपलब्ध नाही आणि सरकारने हे पाऊल उतावीळपणे उचललेय. ज्वेलर्स असेही म्हणतात की, सरकारने आधी हा नियम हॉलमार्किंग सेंटरसाठी बनवला होता, पण नंतर दुकानदारांसाठी देखील ते अनिवार्य केले गेले. ते फक्त हॉलमार्क केलेले दागिने विकू शकतील.

इतर बातम्या- 

नव्या डिझाईनसह Tata Safari Gold बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Gold Silver Price: सोन्याच्या भावात पुन्हा घसरण; रेकॉर्ड स्तरापेक्षा 10200 रुपयांनी स्वस्त

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI