AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO| शंकराच्या प्रिय रुद्राक्षांनी बहरलं उद्यान, कैलास लेणीच्या पायथ्याशी औरंगाबादचं नवं वैभव! प्रवेशाचे वेळापत्रक कसे?

सध्या शहर तसेच जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर निर्बंध आहेत. मात्र ही बंदी उठताच औरंगाबादकर तसेच इथं पर्यटनासाठी येणाऱ्या लाखो पर्यटकांसाठी वेरुळचे हे उद्यान आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे.

PHOTO| शंकराच्या प्रिय रुद्राक्षांनी बहरलं उद्यान, कैलास लेणीच्या पायथ्याशी औरंगाबादचं नवं वैभव! प्रवेशाचे वेळापत्रक कसे?
महादेव वनोद्यानातील शिल्प
| Updated on: Jan 30, 2022 | 3:00 AM
Share

औरंगाबादः भगवान शंकराला (God Shankar) प्रिय अशी फुलं कोणती आहे, त्याच वनस्पतींनी बहरलेलं एक उद्यान वेरुळच्या कैलास लेणीच्या (Ellora Caves) पायथ्याशी साकारालं, जावं अशी कल्पना पाच वर्षांपूर्वी तत्कालीन वने व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती. त्यांच्याच उपस्थितीत 3 फेब्रुवारी 2016 मध्ये 5 हेक्टर जागेवर महादेव वनोद्यानाच्या उभारणीचा शुभारंभ झआला. अन् पाहता पाहता ठरलेल्या मुदतीत कैलास लेणी परिसरात दुर्मिळ वनस्पतींचं हे उद्यान बहरलं. वेरुळच्या या वनोद्यानाचा नुकताच लोकार्पण सोहळा पार पडला. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते हा कार्यक्रम उत्साहात झाला. सध्या शहर तसेच जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर निर्बंध आहेत. मात्र ही बंदी उठताच औरंगाबादकर तसेच इथं पर्यटनासाठी येणाऱ्या लाखो पर्यटकांसाठी हे उद्यान आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे.

Ellora Garden

दुर्मिळ घाटाच्या 12 लक्षवेधी मूर्ती

वेरूळ येथील महादेव वनोद्यानात पंचमुखी, एकमुखी, तीनमुखी, बकुळ, फ्लेमिंगो, त्रिशुळ, ओम रुद्राक्ष, नंदी, पार्वती गणपती कार्तिक, कमळ सरोवर, त्रिशूळ, डमरू, गंगा अशा आकर्षक 12 मूर्ती बसवण्यात आल्या आहेत.

Ellora Garden

उद्यानातील पार्वती अन् बालगणेशाचे शिल्प

उद्यानात प्रवेशासाठी शुल्क आहे ?

या उद्यानात प्रवेशासाठी शुल्क ठेवण्यात येणार आहे. यासंबंधीचा निर्णय काही दिवसात घेतला जाईल .पंधरा वर्षांपुढील पर्यटकांकरिता 20 ते 25 रुपये तिकीट दर आकरले जाऊ शकतात. तसेच उद्यानात छायाचित्रणासाठी वेगळे दर आकारण्यात येतील. या तिकिट विक्रीतून येणाऱ्या निधीतून वनोद्यानाचा सांभाळ होईल व स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होईल. हे वनोद्यान संयुक्त वन समितीस वर्ग करण्यात येईल.

Ellora Garden

सर्व छायाचित्र- स्थानिक पत्रकार वैभव किरगत यांच्या सौजन्याने

उद्यानात दुर्मिळ असे काय ?

सध्या महादेव वनोद्यानाचे काम वनपरिक्षेत्र अधिकारी ए.आर. पेहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वनोद्यानात आतापर्यंत 62 प्रकारच्या प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. यात अनेक झाडांना फुले व फळे आल्याने येथील वातावरण मनमोहक झाले आहे. या ठिकाणी लावण्यात आलेल्या रुद्राक्षांना मोठ्या प्रमाणावर रुद्राक्ष आली आहेत. त्यामुळे असंख्यांसाठी हा कुतुहलाचा विषय ठरत आहे. येथील दुर्मिळ अशा वृक्षांमध्ये सिल्व्हर ओक, मेंदी, बकुळ, कदम, पांगरा, पळस, कांचन, बांबू, मोहा, महोगनी, सुपारी, बेल, टिकोंबा, रुद्राक्ष, सप्तपर्णी, पातोडिया, अर्जुन सादडा, आदींचा समावेश आहे.

Aditya Thackeray

झाडाला लागलेली रुद्राक्ष पाहून आदित्य ठाकरेही भारावले

उद्यानाचे वेळापत्रक काय?

वेरुळ लेणी आणि वनोद्यान यांचे वेळापत्रक एकच राहणार असून संयुक्त वन व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने यावर शुल्क आकारले जाईल. सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे उद्यान सुरु राहील. सध्या कोरोनामुळे पर्यटनावर बंदी आहे. मात्र एरवी निर्बंध नसताना वेरूळ लेणी मंगळवारी बंद असते. आठवड्यातील इतर दिवशी ती सुरु राहते. सदर वनोद्यानदेखील याच दिवशी बंद राहणार आहे.

Ellora Garden

इतर बातम्या-

Budget 2022: फिनटेकमध्ये नव्या तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करण्याची केली जात आहे मागणी,स्किल डेवलपमेंटवर करावा विचार!!

TET Exam Scam | कोण आहे IAS सुशील खोडवेकर ज्याला टीईटी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलीय?

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.