Rajya Sabha Election MIM: जगजाहीर पाठिंबा मागा, मिळेल, ओवैसींच्या गुगलीनं शिवसेना, मविआची अडचण?

Rajya Sabha Election MIM: महाविकास आघाडीने अजून आमच्याशी संपर्क केला नाही. त्यांनी संपर्क केला तर विचार करू. मात्र अद्याप कुणाला मतदान द्यायचे त्यावर आमचा निर्णय घेतला नाही, असं ओवैसी यांनी सांगितलं.

Rajya Sabha Election MIM: जगजाहीर पाठिंबा मागा, मिळेल, ओवैसींच्या गुगलीनं शिवसेना, मविआची अडचण?
जगजाहीर पाठिंबा मागा, मिळेल, ओवैसींच्या गुगलीनं शिवसेना, मविआची अडचण?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 11:37 AM

नांदेड: राज्यसभा निवडणुकीला (Rajya Sabha Election) अवघे तीन दिवस बाकी आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने (maha vikas aghadi) सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. अपक्ष आमदारांचीही बैठक बोलावली आहे. शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत आले आहेत. शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांनाही मुंबईत आणलं जात आहे. राज्यसभेचं राजकीय गणित जुळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची जोडतोड सुरू केली आहे. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) हे सुद्धा महाराष्ट्रात आले आहेत. आता ते नांदेडमध्ये असून संध्याकाळी लातूर येथील एका सभेला संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी ओवैसी यांनी मीडियाशी संवाद साधला. महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधला नाही. राज्यसभेसाठी आमच्याशी कोणीही चर्चा केली नाही. राज्यसभेला कुणाला आमचा पाठिंबा हवा असेल तर त्यांनी आम्हाला जगजाहीर पाठिंबा मागावा. आम्ही पाठिंबा देऊ, असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे. ओवैसी यांनी गुगली टाकल्याने आता शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महाविकास आघाडीने अजून आमच्याशी संपर्क केला नाही. त्यांनी संपर्क केला तर विचार करू. मात्र अद्याप कुणाला मतदान द्यायचे त्यावर आमचा निर्णय घेतला नाही, असं ओवैसी यांनी सांगितलं. महाविकास आघाडीकडून कोणीही आमच्या आमदारांशी संपर्क केला नाही. त्यांना आमची गरज असेल तर आम्हांला संपर्क करा. नाही तर काही गरज नाही. आम्ही आमच्या आमदारांशी बोलत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

पालिका ताकदीने लढणार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवणार आहोत. त्यासाठी आमचा पक्ष सक्रिय झालाय. राज्यभरात दौरे सुरू आहेत, त्यासाठी आज लातुरात सभा होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्या प्रकरणी ओवैसी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. फक्त त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याने काय होणार आहे? असा सवालही त्यांनी केला.

पक्षप्रमुख निर्णय घेतील

एमआएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. संजय राऊत यांनी राज्यसभेच्या मतदानासाठी भाजपकडून अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना ईडी, सीबीआयचा धाक दाखवत असल्याचा आरोप केला होता. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपकडून सेंट्रल एजन्सीचा दुरुपयोग राजरोसपणे होत आहे. तर एमआयएमची राज्यसभा निवडणूकीत काय भूमिका असेल हे पक्षप्रमुख ओवैसी ठरवतील असं त्यांनी स्पष्ट केलं.

दोन आमदारही निर्णायक

राज्यसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली आहे. या निवडणुकीत प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. आधीच सपाने मतदान करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आघाडीची दोन मते कमी झाली आहेत. तर बहुजन विकास आघाडीनेही भाजपला पाठिंबा दिल्याने आघाडीची आणखी तीन मते कमी झाली आहेत. एमआयएमकडे दोन मते आहेत. त्यामुळे एमआयएमकडे आघाडी पाठिंबा मागणार का? असा सवाल केला जात आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.