AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | औरंगाबादच्या पाटलाची महाराष्ट्रात चर्चा, निवडणूक लढवण्याची म्हणतो ‘उमेदवार बायको पाहिजे,’ शहरभर बॅनर

औरंगाबाद (Aurangabad) पालिका निवडणूक लढण्याची इच्छा बाळगणाऱ्या एका अवलियाची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा आहे. त्याला निवडणूक लढवायची इच्छा होती. मात्र लॉकडाऊनमध्ये तिसरे आपत्य झाल्यामुळे तो निवडणुकीसाठी उभा राहू शकत नाहीये. याच तरुणाने चक्क निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको (Wife) पाहिजे असे लिहलेले बॅनर संपूर्ण शहरभर लावले आहे.

Aurangabad | औरंगाबादच्या पाटलाची महाराष्ट्रात चर्चा, निवडणूक लढवण्याची म्हणतो 'उमेदवार बायको पाहिजे,' शहरभर बॅनर
AURANGABAD BANNER
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 1:36 PM
Share

औरंगाबाद : राज्यात सध्या वेगवगळ्या निवडणुका सुरु आहेत. जिल्हा बँक, महापालिकेच्या (Aurangabad Municipal Election) निवडणुकांमुळे वातावरण तापललेले आहे. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षातील उमेदवार आपापल्या परीने जिंकण्यासाठी समीकरणे आखत आहेत. काहीही झालं तरी निवडणूक जिंकायचीच असा निश्चय अनेकांनी मनाशी बांधला आहे. सध्या मात्र औरंगाबाद (Aurangabad) पालिका निवडणूक लढण्याची इच्छा बाळगणाऱ्या एका अवलियाची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा आहे. त्याला निवडणूक लढवायची इच्छा होती. मात्र लॉकडाऊनमध्ये तिसरे आपत्य झाल्यामुळे तो निवडणुकीसाठी उभा राहू शकत नाहीये. याच तरुणाने चक्क निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको (Wife) पाहिजे असे लिहलेले बॅनर संपूर्ण शहरभर लावले आहे. तरुणाच्या या बॅनरची सध्या महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. रेमश विनायकराव पाटील असे तरुणाचे नाव आहे.

तरुणाने शहरभर लावले ‘बायको पाहिजे’चे बॅनर

औरंगाबादेतील तरुण रमेश विनायकराव पाटील यांना लॉकडाऊनमध्ये तिसरे अपत्य झाल्या. तीन अपत्य झाल्यामुळे त्यांना मनपा निवडणूक लढता येणार नाही. मात्र त्यांना निवडणूक लढवण्याची खूप इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी थेट शहरभर बायको पाहिजे असे लिहलेले बॅनर लावले आहे. या बॅनरसोबत त्यांनी बायको कशी असवी हेसुद्धा लिहले आहे. पाटील यांचा प्लॉटिंग चा व्यवसाय आहे. त्यांच्या याच बॅनरची सगळीकडे चर्चा होत आहे.

औरंगाबादेत अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आले आहेत

औरंगाबादेत अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आले आहेत.

उमेदवार बायको पाहिजे, बायको कशी असावी ?

रमेश पाटील यांनी लिहलेले बॅनर अतिशय मजेदार आहे. त्यांनी बॅनरवर पत्नीचे वय तसे च ती कशी असावी याविषयी सविस्तर लिहले आहे. ‘मला तीन मुले असल्यामुळे मी निवडणूक लढवू शकत नाहीये. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी मला उमेदवार बायको पाहिजे. जातीची अट नाहीये. मुलीचे वय 25 ते 40 वर्षादरम्यान असावे. विधवा तसेच घटस्फोटीत मुलगीदेखील चालेल. लग्नासाठी उत्सुक असलेल्या मुलीला दोनपेक्षा जास्त अपत्य नसावे,’ असे पाटील यांनी त्यांच्या बॅनरमध्ये लिहले आहे. तशा अटी त्यांनी सांगितल्या आहेत.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

Creative Work : ‘हा’ मुलगा असं काही करतो, की शॉवरसारखं पाणी यायला लागतं; जुगाडचा Video Viral

Shocking Video : काळ आला होता, पण… पाहा, ट्रकच्या चाकाखाली जाता जाता कसा वाचला युवक

Amazing Skating Video : स्केटिंगही आणि स्टंटही! पण तुम्हाला माहितीये का ‘ही’ व्यक्ती पाहूही शकत नाही

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.