क्रीडा विद्यापीठावरुन इम्तियाज जलील आक्रमक, एमआयएमतर्फे उद्या मोठे आंदोलन, सर्व पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन

औरंगाबाद जिल्ह्यात होणारे स्पोर्ट्स विद्यापीठ पुण्याला हलवण्यात आल्याचा गंभीर आरोप खासदार तसेच एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केला आहे.

क्रीडा विद्यापीठावरुन इम्तियाज जलील आक्रमक, एमआयएमतर्फे उद्या मोठे आंदोलन, सर्व पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन
imtiaz-jaleel

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात होणारे स्पोर्ट्स विद्यापीठ पुण्याला हलवण्यात आल्याचा गंभीर आरोप खासदार तसेच एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केला आहे. राजकीय दबाव वापरून मराठवाड्यातील महत्त्वाची संस्था पळवून नेली आहे, असेही वक्तव्य जलील यांनी केलंय. याच आरोपानंतर आता एमआयएतर्फे उद्या (28 जुलै) आंदोलन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जलील यांनी या आंदोलनात सर्व पक्षांनी सहभागी व्हावे असं आवाहन केलंय. (MP and MIM leader Imtiaz Jaleel will protest in aurangabad made allegations that sports university in Aurangabad district has been shifted to Pune)

इम्तियाज जलील यांचे आरोप काय ?

देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक क्रीडा विद्यापीठ सुरु करण्यात येत आहे. त्याची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातील पुण्यातून रोवण्यात आली आहे. हे क्रीडा विद्यापीठ सुरुवातीला औरंगाबाद येथे सुरु करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, विद्यमान सरकारने हे विद्यापीठ पुणे येथे हलवले. त्यानंतर आता हाच मुद्दा घेऊन एमआयएम आक्रमक झाली आहे. जलील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “औरंगाबादला मिळालेले स्पोर्ट्स विद्यापीठ पुण्याला हलवले. मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागात सरकार फक्त विकासाच्या पोकळ गप्पा मारते. प्रत्यक्षात मात्र मराठवाड्यातील महत्वाच्या संस्था इतर ठिकाणी राजकीय दवाब वापरून पळवून नेल्या जात आहेत. याच मुद्द्यावरुन उद्या औरंगाबादेत मोठे आंदोलन केले जाणार आहे,” असे जलील म्हणाले.

सर्व पक्षांना आंदोलनात सामील होण्याचे आवाहन

एमआयएमतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या उद्याच्या आंदोलनामध्ये सर्व पक्षांनी सामील व्हावे. सर्व पक्षांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहान जलील यांनी केले आहे. दरम्यान, जलील यांनी सर्वपक्षीय नेत्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले असले तरी जिल्ह्यातील कोणते पक्ष आणि नेते या आंदोलनात हजेरी लावणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर बातम्या :

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रात

(MP and MIM leader Imtiaz Jaleel will protest in aurangabad made allegations that sports university in Aurangabad district has been shifted to Pune)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI