घाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर ? औरंगाबादमध्ये खळबळ

घाटी रुग्णालयात कोरोना आणि म्युकर मायकोसिसच्या चाचण्या केल्या जातात. जिल्ह्यातील बहुतांश कोरोना आणि म्युकरचे रुग्ण याच रुग्णालयातील उपचारावर अवलंबून आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या लॅबोरेटरीमध्ये तारीख संपलेले केमिकल्स सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

घाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर ? औरंगाबादमध्ये खळबळ
दत्ता कानवटे

| Edited By: prajwal dhage

Jun 21, 2021 | 11:57 PM

औरंगाबाद : शहरातील घाटी रुग्णालयाच्या लॅबोरेटरीमध्ये आउटडेटेड ( तारीख संपलेले) केमिकल्स वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घाटी रुग्णालयात कोरोना आणि म्युकरमायकोसिसच्या चाचण्या केल्या जातात. जिल्ह्यातील बहुतांश कोरोना आणि म्युकरचे रुग्ण याच रुग्णालयातील उपचारावर अवलंबून आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या लॅबोरेटरीमध्ये तारीख संपलेले केमिकल्स सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (outdated chemicals used in Aurangabad GHATI hospital people demands strict action)

मेडिकल निग्लिजन्स म्हणत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात सध्या कोरोना तसेच म्युकरमायकोसिसच्या टेस्ट केल्या जातात. या टेस्ट ज्या लॅबोरेटरीत होतात अगदी त्याच लॅबोरोटरीत तारीख संपलेले केमिकल्स वापरले जात आहेत. तसा आरोप औरंगाबाद शहरातील सामाजिक कार्यकर्ते भारत फुलारी यांनी केला आहे. त्यांनी या प्रकाराला वाचा फोडली आहे. ही गंभीर बाब समोर येताच भारत फुलारी यांनी हा प्रकार मेडिकल निग्लिजन्स असून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे.

असा प्रकार होऊच शकत नाही

हा प्रकार समोर आल्यानंतर घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता कानन येळीकर यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. ” तारीख संपलेले केमिकल्स आम्ही जेव्हा नष्ट करतो त्यावेळी त्याचे रिकामे वव्हर बाहेर पडलेले असतात; तेच या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. आमच्याकडे असलेली मायक्रोबायलोजी लॅबोरेटरी नॅशनल अ‌ॅक्रिडेटेड आहे. त्यामुळे या लॅबोरेटरीमध्ये असा प्रकार होऊच शकत नाही. केवळ लॅबोरेटरीच्या बाहेर बॉक्स सापडले याचा अर्थ ते केमिकल्स वापरले जात होते असा होत नाही,” असे स्पष्टीकरण कानन येळीकर यांनी दिले आहे.

दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत जे रिपोर्ट समोर आलेले आहेत ते सगळे सदोष होते का ? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

इतर बातम्या :

अंजिठा लेणीवर बिबट्याचा वावर, वैजापूरमध्ये दोघांवर हल्ला, औरंगाबादेत खळबळ

विवाहाला मान्यतेनंतरही औरंगाबादेत प्रियकराची आत्महत्या, अल्पवयीन प्रेयसीचाही गळफास

औरंगाबादेत डिझेलच्या टँकरचा अपघात, नागरिकांची ड्रम, भांडे घेऊन घटनास्थळी धाव

(outdated chemicals used in Aurangabad GHATI hospital people demands strict action)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें