दिवाळीचा मुहूर्त साधत शिवसेनेचा विकासकामांचा डंका, औरंगाबाद शहरात झळकवले 200 आकाशदिवे

दिवाळीतील आकाशदिव्यांचा शिवसेनेने प्रचारासाठी वापर केल्याने विविध पक्षांनी यावर टीका केली आहे तर नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या दिव्यांवर विकासयोजनांची माहिती देण्यात आली आहे.

दिवाळीचा मुहूर्त साधत शिवसेनेचा विकासकामांचा डंका, औरंगाबाद शहरात झळकवले 200 आकाशदिवे
विकासकामांच्या प्रचारासाठी औरंगाबादमध्ये शिवसेनेने 200 विकासदीप झळकवले

औरंगाबादः महापालिकेची निवडणूक आणि दिवाळीचे औचित्य साधत शिसवेनेचे (Aurangabad Shivsena) औरंगाबादेत शहरभर विकासकामांचे प्रदर्शन करण्याचा धडाका हाती घेतला आहे. 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान शहरातील 50 हजार घरांवर भगवा ध्वज फडकवण्याचा विक्रम शिवसेनेने हाती घेतला आहे. तसेच औरंगाबाद शहरात आकाशदिव्यांच्या माध्यमातून विकासकामांचा प्रचार सुरु आहे. महापालिकेतील (Corporation Election) कामाची उजळणी करतानाच केंद्राच्या स्मार्ट सिटीतील कामाचे श्रेयही शिवसेनाच लाटत आहे. शिवसेनेच्या या निवडणूक दिवाळीवर विरोधकांनी मात्र कडाडून टीका केली आहे.

जनता जागा नक्की दाखवेल- मनसे

शिवसेनेच्या या विकासकामांच्या प्रचारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून टीका केली. एवढी वर्षे प्रामाणिकपणाने कामे केली असती तर दिव्यांच्या शुभेच्छांऐवजी असा प्रचार करण्याची गरज भासली नसती, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लगावला आहे. तसेच शिवसेनेने शहरासाठी एकही काम केलेले नाही. जनता सुजाण आहे, येत्या निवडणुकीत शिवसेनेला जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख सुहास दाशरथे यांनी केले.

शिवसेनेचे झळकवले 200 विकासदीप

महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्राचारासाठी दिवाळीचा मुहूर्त साधला आहे. शिवसेनेने शहरभर 200 विकासदीप लावले आहेत. 7 बाय 7 फूट आकाराचे दिवे स्टीलच्या फ्रेमवर साकारले असून वीजेचे खांब, इमारती तसेच चौकात लावले आहेत. प्रत्येक वॉर्डात किमान एक, तर महत्त्वाच्या ठिकाणी 2-3 दिवे लावल्याची माहिती आमदार व जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिली.

आकाशदिव्यांवर प्रचाराचा मजकूर

दिवाळीतील आकाशदिव्यांचा शिवसेनेने प्रचारासाठी वापर केल्याने विविध पक्षांनी यावर टीका केली आहे तर नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या आकाशदिव्यांवर ‘विकासात अग्रेसर-शिवसेना संभाजीनगर, शहरासाठी 1680 कोटींची पाणीपुरवठा योजना, शहरातील प्रमुख 23 रस्त्यांसाठी 152 कोटींचा निधी, गुंठेवारीची घरे नियमित केली’ चिकलठाणा-पडेगाव येथे कचरा प्रक्रिया केंद्र, कांचनवाडी बायोमिथेन प्रकल्प, ठाकरे स्मृतिवन व स्मारकाचे भूमिपूजन असे मजकूर लिहिले आहेत.

इतर बातम्या

पर्यटकांना सुरक्षित वाटण्यासाठी औरंगाबादेत 100 टक्के लसीकरण आवश्यक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

आता 1000 च्या पुढच्या लाखो रुपयांच्या लडींचे करायचे काय? जिल्हाधिकाऱ्यांच्या ऐनवेळच्या बंदीने व्यापाऱ्यांसमोर संकट

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI