दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी कर्णपुऱ्यातील बालाजी मंदिरात जबरी चोरी, तीन दानपेट्या लंपास

औरंगाबाद: नवरात्र आणि दसऱ्याचा सण संपत नाही, तोच औरंगाबादची ग्राम देवता असलेल्या कर्णपुरा देवीच्या (Karnpura Devi) परिसरातील बालाजी मंदिरातील (Balaji Temple) दानपेट्या चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. या धाडसी चोरीमुळे मंदिर परिसरातील पुजारी आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दीड वाजता पुजाऱ्यांना शटरचा आवाज पोलिसांनी […]

दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी कर्णपुऱ्यातील बालाजी मंदिरात जबरी चोरी, तीन दानपेट्या लंपास
बालाजी मंदिरातील दानपेट्या चोरीला
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 4:56 PM

औरंगाबाद: नवरात्र आणि दसऱ्याचा सण संपत नाही, तोच औरंगाबादची ग्राम देवता असलेल्या कर्णपुरा देवीच्या (Karnpura Devi) परिसरातील बालाजी मंदिरातील (Balaji Temple) दानपेट्या चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. या धाडसी चोरीमुळे मंदिर परिसरातील पुजारी आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दीड वाजता पुजाऱ्यांना शटरचा आवाज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दीड वाजेच्या सुमारास कर्णपुरा बालाजी मंदिराच्या जवळ राहणारे अनिल पुजारी यांना जाग आली. मंदिराचे शटर कुणीतरी उघडत असल्याचा आवाज येत होता. तसेच घराबाहेर काही लोक असल्याचे जाणवताच त्यांनी आरडाओरड सुरु केली. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे रहिवासीदेखील जागे झाले. सर्वांनी मंदिराकडे धाव घेतली असता मंदिराच्या समोरील चॅनल गेटचे कुलूपही तोडलेले होते. तर पाठीमागील दुसरा दरवाजादेखील उघडा होता.

एकूण तीन दानपेट्या चोरीला

या घटनेत बालाजी मंदिरातील 30 ते 35 किलो वजनाची दानपेटी आणि एक लहान दानपेटी अशा दोन दानपेट्या चोरीला गेलेल्या आढळून आले. तसेच बालाजी मंदिरासमोरील हनुमान मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. पूजाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना देताच छावणी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. शिवाय फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले. यावेळी श्वानपथकही दाखल झाले होते. मात्र पाऊस पडल्याने श्वान पथकाची मदत घेता आली नाही. मंदिराचे पूजारी यांच्या फिर्यादीवरून दुपारपर्यंत छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

सुदैवाने दानपेट्या मुख्य पेटी वाचली

नवरात्रीच्या नऊ दिवसात मंदिरातील सर्व पेटीत जमा झालेले पैसे एक दिवस आधीच काढून एका पेटीत मंदिरातच ठेवण्यात आले होते. चोरट्यांनी पळवून नेलेल्या तीन पेट्यांमध्ये फक्त एका दिवसाचे साधारण पन्नास हजारांच्या आसपास दान असावे, असा अंदाज पुजाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच सुदैवाने पैसे भरून ठेवलेल्या मंदिरातील पेटीकडे चोरट्यांचे लक्ष गेले नाही, त्यामुळे ती सुरक्षित असल्याचे मंदिराचे पुजारी अनिल प्रभाकर पुजारी यांनी सांगितले.

संशयितांकडून लहान मुलांकडे विचारणा

कर्णपुरा परिसरात काही लहान मुले खेळत असताना त्यांना दोन ते तीन जणांनी बालाजी मंदिराबाबत विचारणा केली होती. शिवाय मंदिराबाबतची माहितीदेखील विचारली होती. अशी माहिती समोर आली आहे. कर्णपुऱ्यातील बालाजी मंदिरात 16 ते 17 वर्षांपूर्वी अशीच चोरी घडली होती. आता ही चोरीची दुसरी घटना असल्याची माहिती पुजाऱ्यांनी दिली.

इतर बातम्या-

पिशवी आडवी लावून हातचलाखीने मोबाईल लंपास, सांगलीत टोळी जेरबंद

ज्वेलरच्या दुकानातून 20 तोळे सोन्यासह कामगार पसार, कोलकात्यातून दोघांना अटक

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.