Aurangabad Tourism: महिनाभरापासून बंद असलेली अजिंठा लेणी बससेवा सुरू, पर्यटकांना दिलासा

गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अजिंठा लेणी परिसरात येणाऱ्या पर्यटकांची मोठी गैरसोय होत होती. मात्र यातील काही कर्मचारी कामावर रुजू झाल्यामुळे सोयगाव आगारातून आला लेणीपर्यंतची बससेवा सुरु झाली आहे.

Aurangabad Tourism: महिनाभरापासून बंद असलेली अजिंठा लेणी बससेवा सुरू, पर्यटकांना दिलासा
अजिंठा लेणीसाठीची बस
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 3:02 PM

औरंगाबादः एसटी महामंडळाच्या (ST Strike) कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या महिनाभरापासून बंद असलेली अजिंठा लेणीतील (Ajanta caves) बससेवा अखेर बुधवारपासून सुरु करण्यात आली आहे. बुधवारी सोयगावा आगाराने 6 बस आणि 10 कर्मचारी लेणी परिसरात तैनात केले. फर्दापूर टी पॉइंट ते अजिंठा लेणी या दरम्यानची वाहतूक आता बसमुळे सुरुळीत झाली आहे. यामुळे अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची मोठी सोय झाली आहे.

पर्यटन व्यवसायाला मोठा फटका

एसटी कर्मचाऱ्यांनी शासनात विलीनीकरणाऱ्या मागणीमुळे गेल्या महिनाभरापासून संप पुकारला आहे. त्यामुळे 30 पेक्षा जास्त दिवसापासून अजिंठा लेणीतील बससेवा बंद झाली होती. यामुळे पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागला. दरवर्षी या काळात सोयगाव आगाराला अजिंठा लेणीतून रोज जवळपास दोन लाख रुपयांचा महसूल प्राप्त होतो. मात्र यंदा संपामुळे 72 लाख रुपयांचा फटका बसला आहे.

बुधवारपासून अजिंठ्यातील बससेवा सुरळीत

सोयगाव आगारात आता लेणीपर्यंत बससेवा सुरळीत केली आहे. बुधवारी संपातील काही वाहक, चालक कामावर रूजू झाले. त्यामुळे पर्यटकांच्या सोयीसाठी आता 6 बसेस, 3 वाहक, 6 चालक आणि एक वाहतूक नियंत्रक असे एकूण 10 कर्मचारी तैनात केले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा प्रश्न हळू हळू सुटताना दिसत आहे. तसेच वातावरणात होत असलेले बदलही चांगले आहेत. औरंगाबाद आणि परिसरात आरोग्यदायी हिवाळ्याचे वातावरण असून आगामी काळात पर्यटकांची संख्याही वाढेल, अशी अपेक्षा आहे.

इतर बातम्या-

रोहित पाटलांच्या ‘बघून घेतो’च्या भाषेवर अजित पवारांचं पहिल्यांदाच उत्तर; सांगलीत वाद चिघळणार?

Ajit Pawar | हा अधिकार त्यांचाच आहे म्हणत अजित पवारांनी राज्यपालांना लोकशाहीचा धडा सांगितला, नेमकं काय म्हणाले?

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.