आमदार, खासदार, मंत्र्यांच्या घरात बिबट्या शिरला पाहिजे… बच्चू कडूंचा संताप; सरकारवर डागली तोफ
बच्चू कडू यांनी नुकताच सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी थेट म्हटले की, हजार बिबट्यांचा तुम्ही बंदोबस्त करू शकत नाही ...जाऊ तिथं खाऊ असं सरकार आहे. यासोबतच ते प्रवीण परदेशी यांच्यावरही टीका करताना दिसले.

नुकताच बच्चू कडू यांनी बिबट्याच्या विषयावरून सरकारला धारेवर धरले. हेच नाही तर आमदार खासदारांच्या घरात बिबट्या शिरला पाहिजे तेव्हा त्यांना कळेल, असेही त्यांनी म्हटले. बच्चू कडू यांनी म्हटले की, जंगलात 200 शेळ्या सोडतील आणि सांगतील 1000 शेळ्या सोडल्या. जाऊ तिथे खाऊ हे सरकारचे धोरण आहे. अटक वारंट रद्द झाला पाचशे रुपये दंड आम्हाला दिला. न्यायालय आम्हाला सहकार्य करेल आमची मागणी मंत्री होण्यासाठी नव्हती आमची प्रकल्पग्रस्तांसाठी मागणी होती. मुख्यमंत्री राहतात तिथून 25 किलोमीटरवर प्रकल्प ग्रस्त राहतात. बावनकुळे काहीच निर्णय घेत नाहीत. त्यांना रेती शिवाय काहीच दिसत नाही. मरणारा शेतकरी हिंदू नाही का… सगळ्यात जास्त नुकसान यावर्षी झालं आहे.
पुढे बच्चू कडू यांनी म्हटले, चालू वर्षाची कर्जमाफी करावी लागेलच. कर्जमाफी योग्य पद्धतीने केली नाही तर विदर्भात नाहीतर पूर्ण महाराष्ट्रात रेल्वेचे चाक धावणार नाही मी सर्वे केला रुळावर माणूस दिसणार नाही पण रेल्वे धावणार नाही. जोपर्यंत बिबट्या आमदार, खासदाराच्या घरात घुसत नाही तोपर्यंत काही होत नाही.. जेव्हा त्यांच्या घरात घुसेल तेव्हा यांना जाग येईल.. दरवर्षी बिबट्याने 400- 500 लोक मरतात यांची मुलं बाळ त्यात मरत नाही ना… 1000 शेळ्या सोडल्या असं सांगणार आम्ही 200 शेळ्या सोडणार..
हजार बिबट्यांचा तुम्ही बंदोबस्त करू शकत नाही …जाऊ तिथं खाऊ असं सरकार आहे. प्रवीण परदेशी यांना मी विनंती केली की तुम्ही कर्जमाफीसाठी मध्यवर्ती बँकेच्या बैठक घ्या. आम्ही म्हटलं म्हणून त्यांनी बैठक लावली प्रवीण परदेशी म्हणजे पूर्ण परदेशी आहे ते देशातले आहे की नाही तपासले पाहिजे. रवी राणा यांनी केलेल्या विधानावर बोलताना बच्चू कडू यांनी म्हटले की, असे पाळणारे भरपूर आहेत त्यात काही नवीन गोष्ट नाही ती मांजरच आहे मोठी.
अदानी हत्ती पाळतो म्हणत हे बिबट्या पाळतो म्हणत कशा प्रकारची किल्ले उडवायची. इथे शेतकरी रोज मरतोय, त्याचं नुकसान होतंय आणि तुम्ही त्या प्रश्नावर खिल्ली उडवतात. गिरीश महाजन यांच्याबद्दल बोलताना बच्चू कडू यांनी म्हटले, आम्ही त्यांच्या बाजूने आहे जे झाड तोडण्यासाठी विरोध करत आहेत, वेळ पडली तर आम्ही सुद्धा तिथे जाऊन असे कसे झाडे तोडतात ते पाहू.
तुम्ही साधू संतांचा अपमान करता तुकाराम महाराजांनी झाडावर अभंग लिहिले. यांना अक्कल आहे की नाही का गेली सगळी सत्ता आणि पैसा मस्ती आली आहे. 15 ते 20 टक्के ईव्हीएममध्ये घोळ आहे, मेहता नावाची ग्रस्त आहेत, राज ठाकरेंनी सुद्धा कशा प्रकारची चोरी होते जाहीरपणे सांगितले आहे. माझी जर बॅट चिन्ह आहे तर ती बॅट दिसेल मात्र मागून कमल राहील, बॅटचे चिन्ह आहे ते पुसद रंगाचा आहे ते तीन दिवसात गायब होईल आणि कमळ कायम राहील, ही पहिली चोरी.
चार सेकंदाच्या आत जर तुम्ही गेले तर कमळ पडतंय. EVM मशीन कायमची बंद झाली पाहिजे, मर्दानगी असेल रामभक्त असाल तर बॅलेट वर या. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या शक्यतेवर बोलताना बच्चू कडू यांनी म्हटले की, काय भलं काय होणार आहे शेतकऱ्याचं, जे काही भलं होईल ते दोघांचा होईल आमचं काय भलं होणार आहे. असं म्हटलं आहे का अजित पवार आणि शरद पवार शेतकऱ्यांच्या निर्णयासाठी एकत्र येणार आहेत. ते सत्तेसाठी एकत्र येणार आहे त्यात नवल काय आहे.
पुऱ्या हिंदुस्थानात अशोकराव चव्हाण यांचा कारखाना सगळ्यात गरीब आहे. अन अशोकराव चव्हाण सुद्धा सगळ्यात गरीब आहेत, मी खूप मानायचो त्या माणसाला. बाकीच जर 2800 पर्यंत तुम्ही जर 2300 पर्यंत राहताय तर कसा कारखाना चालतो ते आम्ही पाहू. उलट आम्हाला अपेक्षा होती, तुमचा कारखाना जगात जास्त पहिली उचल देईल आणि त्याचा आदर्श सगळा नांदेड जिल्हा घेईल. जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले त्यांच्या कारखान्याकडून ही हाल आहे तर बाकीच्या कडून काय अपेक्षा करायची
चायना अमेरिकेचे सोयाबीन घेणे बंद केल्यामुळे आपल्याला फार चांगला चान्स आहे. आमची कर्जमाफीची लढाई झाल्यानंतर हमीभावाची लढाई प्रत्येक तालुक्यात गावात उभी करणार. नाफेड खरेदी केंद्रावर घोळ आहे 25% माल व्यापाऱ्याचा आहे. शेतकऱ्यांना एकत्र करणं म्हणजे ब्रह्मदेव एकत्र करणं जातीपातीच्या लढाईत लोक सहज एकत्र होतात, असे बच्चू कडू यांनी म्हटले.
