AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

wine Ban | ‘ठरलं तर मग गावातल्या किराणा मालाच्या दुकानात वाईन विक्रीला बंदी’ , पुण्यातील ‘या’ ग्रामपंचायतीनं घेतला मोठा निर्णय

पंचायतीनेही आता गावातील किराणामालाच्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या ऑनलाइन ग्रामसभेमध्ये हा निर्णय घेण्यात या आला आहे. सर्व ग्रामस्थांनी एक मतांने हा निर्णय घेतला आहे.

wine Ban | 'ठरलं तर मग  गावातल्या किराणा मालाच्या दुकानात वाईन विक्रीला बंदी' , पुण्यातील 'या'  ग्रामपंचायतीनं घेतला मोठा निर्णय
wine
| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 2:08 PM
Share

 प्राजक्ता ढेकळे , पुणे – महाविकास आघाडी सरकाराच्या (Mahavikas Aghadi Government) सुपर मार्केटमध्ये (supermarket) वाईनच्या (wine )  विक्रीच्या धोरणाला सर्वच स्तरातून विरोध होत आहे. व्यापारी संघटना , तसेच शहरातील नागरिकनांही या निर्णयाचा विरोध केला होता . यानंतर आता पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगाव पुण्यातील या ग्रामपंचायतीतील नागरिकांकडून विरोध होता आहे. विविध व्यापारी संघटनांनी विरोध केल्यानंतर आता ग्रामपंचायतीतील लोकांनीही याला विरोध दर्शवला आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगाव ग्राम पंचायतीनेही आता गावातील किराणामालाच्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या ऑनलाइन ग्रामसभेमध्ये हा निर्णय घेण्यात या आला आहे. सर्व ग्रामस्थांनी एक मतांने हा निर्णय घेण्यात आला आहे. आश्चर्यांची बाब म्हणजे महाविकास आघाडी सरकारचे प्राबल्य असलेले नेते या जिल्ह्यातील व तालुक्यातील आहेत.

परंपरा सांभाळण्यासाठी घेतला निर्णय

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार पारगाव येथे ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या मद्य विक्रीचा परवाना देण्यात आलेला नाही. गेल्या अनेकवर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने नुकत्याच घेतलेल्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या धोरणाला ग्रामस्थांनी विरोध करत आपला निषेध नोंदवलं आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामसभेत घेण्यात आलेल्या वाईन बंदीच्या ठरावाला पारगावचे माजी सरपंच अरुण बोत्रे यांनी मांडला व त्यास सरपंच जयश्री ताकवणे, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन सुभाष बोत्रे, भीमा पाट्सचे संचालक तुकाराम ताकवणे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष संजय ताकवणे यांनी अनुमोदन दिले.

गावात संपूर्ण दारूबंदी

जवळपास 16 हजार लोकसंख्या असलेल्या या गावात अद्याप एकही दारुचे दुकान नाही. तसेच ग्रामपंचायतीनेही कोणत्याही प्रकारची परवानगी या प्रकारच्या दुकानांसाठी दिलेली नाही. कोणत्याही प्रकाराच्या निवडणुकीत मतांसाठी दारूचा वापर केलेला नाही. राजकारणात सक्रिय असलेले या गावातील राजकीयनेतेही दारू पीत नाहीत. गावाने घेतलेल्या या निर्णयाचे सामाजिक कार्यकर्त्या वसुधा सरदार यांनी गावाच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.

Nashik Crime | डॉ. सुवर्णा वाजेंच्या खुनाचे गूढ काय, जळालेली हाडे कुणाची, कुटुंबाच्या जबाबवरून पोलीस गाठणार स्वर्ग?

नसीरुद्दीन शाहांच्या मुलाबरोबर 7 वर्ष लिव्ह इन, आता ‘सबा’च्या ऋतिकबरोबर अफेयर्सच्या चर्चा!

Gupt Navratri | उत्तम फलप्राप्तीसाठी गुप्त नवरात्रीमध्ये हे वास्तू नियम लक्षात ठेवा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.