'आमचं ठरलंय, मटण नदीच्या पलीकडं', कोल्हापुरात मटण दरवाढीविरोधात मोहीम

आमचं ठरलंय, असं म्हणत बावडेकर आता मटण व्यावसायिकांविरोधात एकवटले आहेत.

'आमचं ठरलंय, मटण नदीच्या पलीकडं', कोल्हापुरात मटण दरवाढीविरोधात मोहीम

कोल्हापूर : ‘आमचं ठरलंय, मटण नदीच्या पलीकडे’, कोल्हापुरातल्या कसबा बावड्यातल्या भारत वीर मंडळाचा हा बोर्ड सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे (Kohapur Mutton Rates). कारण आमचं ठरलंय, असं म्हणत बावडेकर आता मटण व्यावसायिकांविरोधात एकवटले आहेत. कसबा बावड्यातील मटणाच्या किमती आता खवय्यांचा खिसा रिकामा करत आहेत आणि म्हणूनच सगळे बावडेकर ‘आमचं ठरलंय’ म्हणत मटण आता नदीच्या पलीकडून आणणार आहेत (Kohapur Mutton Rates).

कोल्हापूरचं मटण आणि तांबड्या-पांढर्‍याची जगभर ख्याती आहे (Kolhapur Mutton). इथला झणझणीत रस्सा मटण खायला बाहेरगावचे लोकही कोल्हापूरला भेट देतात. तसेच, इथल्या अनेक घरात तर दर बुधवारी आणि रविवारी मटणाचा बेत ठरलेलाच असतो. पण, हेच मटण आता कोल्हापूरकरांचा खिसा रिकामा करत आहे. कारण 300, 400 म्हणता म्हणता आता इथले मटणाचे दर 600 रुपये किलोवर पोहचले आहेत.

वाढलेले दर कोल्हापूरकरांना परवडत नाही आणि मटण सोडणं त्यांना शक्य नाही. त्यातल्या त्यात ग्रामीण भागात दर जरा तरी कमीआहेत. पण शहरी भागात आणि उपनगरांतील दर ऐकूनच भीती वाटावी अशी स्थिती आहे. म्हणूनच या विरोधात आता बावडेकरांनीच पुढाकार घेत मटण नदीच्या पलीकडून आणायचं ठरवलं आहे.

मटण दरवाढी विरोधातल्या या अनोख्या मोहिमेत महिला ही मागे नाहीत. मटणाचे दर असेच वाढले, तर आमच्याकडे तांबडा-पांढरा खायला येणाऱ्यांना आम्ही काय खायला घालायचं, असा प्रश्न उपस्थित करत महिलाही या मोहिमेचं समर्थन करत आहेत.

मटणाचे दर वाढत असल्यानं कोल्हापूरकर चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. त्यांची ही अस्वस्थता आता सोशल मीडियातही दिसू लागली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *