AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! सावधान!! दक्षिण आफ्रिकेतून आलेले 6 जण कोरोना पॉझिटिव्ह, ओमिक्रॉनचीही चाचणी, 6 मेट्रो शहरात रुग्ण

ह्या सर्वांचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जातेय. याच चाचणीत डोंबिवलीतल्या रुग्णाचा शोध लागला. संबंधीत रुग्ण हा 40 वर्षांचा आहे आणि तो दक्षिण आफ्रिकेचाच रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सावधान! सावधान!! दक्षिण आफ्रिकेतून आलेले 6 जण कोरोना पॉझिटिव्ह, ओमिक्रॉनचीही चाचणी, 6 मेट्रो शहरात रुग्ण
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 7:16 AM
Share

दक्षिण आफ्रिका आणि युरोपात ओमिक्रॉनच्या केसेस वाढत असतानाच आणि त्यामुळे महाराष्ट्रासह जगभरात भीती वाटत असतानाच राज्यात 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. विशेष म्हणजे हे सहाही नवे रुग्ण हे दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले आहेत. बरं हे सर्व कोरोनाग्रस्त एकाच शहरातले नाहीत. तर महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या शहरात आहेत. त्यात मुंबई, पुणे, भाईंदर, डोंबिवली आणि पिंपरीचा समावेश आहे. त्यामुळेच त्या त्या शहरात सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं जातंय. प्रशासनही अलर्टवर आहे. पण हे सहाही रुग्ण हे ओमिक्रॉन विषाणूने संक्रमित आहेत की नाही याचा चाचणी रिपोर्ट येणं अजून बाकी आहे.

कुठे किती रुग्ण?

दक्षिण आफ्रिकेतून एक जण हा डोंबिवलीत (Dombivali Corona case) आला आणि त्यानंतर मुंबईलाही हादरले बसले. त्या संबंधीत प्रवाशाची चाचणी झाली. त्याच्या कुटुंबियाचीही झाली. त्यात तो प्रवाशी पॉझिटिव्ह आला. सुदैवानं कुटुंबिय मात्र नेगेटीव्ह निघाले. पण त्याच दक्षिण आफ्रिकेतून महाराष्ट्रात आलेले इतर पाच जण मात्र पॉझिटिव्ह निघालेत. त्यात मुंबई, पुणे, भाईंदरमधल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे तर पिंपरीच्या दोघा जणांचा समावेश आहे. दरम्यान ह्या सहा जणांना ओमिक्रॉनची लागण झालीय का नाही त्याच्या तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आलेत. जिनोम सिक्वेन्सिंगही करण्यात आलीय. त्याचा रिपोर्ट येणं मात्र बाकी आहे.

इतर आकडा काय सांगतो?

ओमिक्रॉनचा मुकाबला करण्यासाठी मुंबईसह पुणे आणि इतर शहरं सज्ज होतायत (Maharashtra corona new cases). शाळांचा निर्णय बहुतांश ठिकाणी (महापालिका क्षेत्रात) पुढे ढकलण्यात आलाय. दरम्यान गेल्या काही काळात परदेशातून विशेषत: ओमिक्रॉन संक्रमित देशातून जे प्रवाशी महाराष्ट्रात आले त्यांचं ट्रेसिंग सुरु आहे. त्यात 15 दिवसांपूर्वी मुंबईत 466 जण आलेत. पैकी 100 जण हे मुंबईतील आहेत. ह्या सर्वांचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जातेय. याच चाचणीत डोंबिवलीतल्या रुग्णाचा शोध लागला. संबंधीत रुग्ण हा 40 वर्षांचा आहे आणि तो दक्षिण आफ्रिकेचाच रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

दक्षिण आफ्रिकेतली स्थिती काय?

दक्षिण आफ्रिकेत (South Africa omicron cases) भारतीय वंशाच्या किंवा काम करणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी आहे. फक्त दक्षिण आफ्रिकाच नाही तर इतर आफ्रिकन देशातही ही संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे तिथल्या स्थितीवर भारताचं बारीक लक्ष असेल. सध्य स्थितीत दक्षिण आफ्रिकेच्या सर्वच प्रांता (राज्य) मध्ये ओमिक्रॉनचे नवे रुग्ण आढळतायत. रविवारपर्यंत ही संख्या 2800 एवढी होती. चालू आठवड्याच्या शेवटपर्यंत हाच रुग्णांचा आकडा 10 हजारपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जातोय. त्यामुळेच आफ्रिकेतल्या स्थितीवर जगाचं लक्ष आहे.

हे सुद्धा वाचा:

Bhiwandi Corona Update | भिवंडीतील मातोश्री वृद्धाश्रमात कोरोनाचा उद्रेक सुरुच, आणखी 17 जण पॉझिटीव्ह

Zodiac Pisces | मीन राशीबाबत या गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती नसतील

Nagpur School Reopen गावातले चिमुकले जाणार आजपासून शाळेत, शहरातल्यांना 10 पर्यंत थांबा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.