आधी भिंतीवरील थुंकी पुसली, आता स्वत:लाच पाच हजाराचा दंड ठोठावला, IAS आस्तिककुमार पांडेंचं हटके काम

कर्तव्यनिष्ठ आयएएस अधिकारी आणि सध्याचे बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे (Beed Collector Asik Kumar Pande penalize himself ) यांनी स्वत:लाच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

आधी भिंतीवरील थुंकी पुसली, आता स्वत:लाच पाच हजाराचा दंड ठोठावला, IAS आस्तिककुमार पांडेंचं हटके काम

बीड : कर्तव्यनिष्ठ आयएएस अधिकारी आणि सध्याचे बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे (Beed Collector Asik Kumar Pande penalize himself ) यांनी स्वत:लाच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. विधानसभा निवडणुकीसंदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी (Beed Collector Asik Kumar Pande penalize himself ) तसेच जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती.  या पत्रकार परिषदेत पत्रकारांना चहा देण्यात आला. मात्र चहा प्लास्टिक मिश्रित कपात देण्यात आल्याची तक्रार एका पत्रकाराने केली.  यावेळी कारवाईचा भाग म्हणून जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी स्वतःलाच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.

निवडणुकीत प्लास्टिकचा वापर केला जाऊ नये असं आवाहन निवडणूक आयोगाने केलं आहे. महाराष्ट्रात प्लास्टिकबंदी संदर्भात कडक नियम करण्यात आले आहेत. मात्र याची पायमल्ली होत असतानाच, बीडच्या जिल्हाधिकाऱ्याने स्वतःलाच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

अकोल्यात भिंतीवरील पिचकाऱ्या स्वत: साफ

आस्तिककुमार पांडे हे अकोल्याचे जिल्हाधिकारी होते, त्यावेळीही ते त्यांच्या हटके कामामुळे चर्चेत आले होते. आस्तिककुमार पांडे यांनी अकोल्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अचानक भेट दिली होती. त्यावेळी कार्यालयातील भिंती पान, खर्र्ऱ्याच्या पिचकाऱ्यांनी रंगल्या होत्या. थुंकीने भरलेल्या भिंती आस्तिककुमार पांडे यांनी स्वत: साफ केल्या होत्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *