‘इंदोरीकर महाराज लस घेत नाहीत, तोपर्यंत कीर्तन होऊ देऊ नका,’ थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी लस घेईपर्यंत, त्यांच्या कीर्तनावर बंदी आणण्यात यावी. अशी मागणी बीडच्या शेतकरीपुत्राने मुख्यमंत्र्यांना केलीय.

'इंदोरीकर महाराज लस घेत नाहीत, तोपर्यंत कीर्तन होऊ देऊ नका,' थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी
INDURIKAR MAHARAJ
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 5:53 PM

बीड : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी लस घेईपर्यंत, त्यांच्या कीर्तनावर बंदी आणण्यात यावी, अशी मागणी बीडच्या शेतकरीपुत्राने मुख्यमंत्र्यांना केलीय. ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आलीय. कोरोनाची लस घेतलीही नाही आणि घेणारही नाही, असं इंदोरीकर महाराज 3 नोव्हेंबर रोजी म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याविरोधात ही मागणी करण्यात आलीय.

लस घेत नाहीत, तोपर्यंत कीर्तन होऊ देऊ नये

“काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांनी मी लस घेणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे जनजागृती करणाऱ्यांचं खच्चीकरण होत आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराज जोपर्यंत लस घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचे कीर्तन होऊ देऊ नये,” असं बीडमधील एका किसानपुत्राने म्हटलंय. या नव्या मागणीमुळे इंदोरीकर महाराज आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

इंदोरीकर महाराज काय म्हणाले होते ?

इंदोरीकर महाराज आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यापूर्वी त्यांनी मुलगा आणि मुलीच्या जन्मावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. तर काही दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही, आणि घेणारही नाही असं म्हटलं होत. तीन नोव्हेंबर रोजी एका कार्यक्रमात बोलताना “कोरोना काळात शिक्षित लोकांनी चुकीचं वर्तन केलं. आपल्याच घरातील प्रिय व्यक्तींना, जवळच्या व्यक्तींना अतिशय चुकीच्या पद्धतीने वागवलं. त्यांना चांगल्या ताटात जेवणं दिलं नाही. त्यांच्या अंथरायच्या पांघरायच्या गोधड्या जाळल्या. त्यांच्या हाताला स्पर्श होणार नाही, इतकं फटकून त्यांच्याशी वागले. इथं हात लावू नको, तिथं हात लावू नका, अशी सगळी कोरोनाकाळात परिस्थिती होती. पण मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतंच नाही तर लस कशाला घ्यायची”, असं इंदोरीकर महाराज म्हणाले होते.

इतर बातम्या :

एसटी संपाबाबत राज्य सरकारची पहिली कारवाई, चंद्रपुरातील 14 कर्मचाऱ्यांचं निलंबन!

Rafale Scam: फ्रेंच मॅगझिनच्या दाव्यानंतर राफेल विमान भ्रष्टाचार प्रकरणात भाजप आणि काँग्रेसमध्ये परत जुंपली

CBSE Admit Card 2021: सीबीएसईकडून दहावी बारावीच्या पहिल्या टर्म परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, डाऊनलोड कसं करायचं?

(beed man demands do not allow indurikar maharaj to perform kirtan until his complete covid vaccination)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.