Beed : राजकारण करा, पण परळीच्या खड्ड्यांकडेही लक्ष द्या, आमदार धनंजय मुंडेंवर नागरिक संतप्त!

अनेक वेळा मागणी करूनही रस्त्याचे काम झालेलं नाही. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आलाय. सदरील रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावं अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय.

Beed : राजकारण करा, पण परळीच्या खड्ड्यांकडेही लक्ष द्या, आमदार धनंजय मुंडेंवर नागरिक संतप्त!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 3:07 PM

बीडः राज्यातील राजकारणात नेहमीच सक्रिय असलेल्या धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) त्यांच्याच मतदार संघातल्या नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. बीड जिल्ह्यात(Beed Rain) यंदा फार पाऊस झाला नाही. मात्र एवढ्याशा पावसामुळे परळीतील रस्ते बेहाल झाले आहेत. परळी शहरातून  (Parali)गाव खेड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. राज्यात परळीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मुंडेंच्याच गावातील ग्रामीण भागांना जोडणाऱ्या रस्त्यांना असं बकाल रूप आलं आहे. परळी ते मलकापूर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने संपूर्ण रस्ता उखडून निघाला आहे. या परिस्थितीमुळे ग्रामस्थांचे हाल होत असून आमदाराचं मतदारसंघात लक्ष आहे की नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Parali roads

नागरिकांची कसरत, रस्ता दुरुस्तीची मागणी

परळीतून इतर गावांना जोडणार डोंगरावरील माती रस्त्यावर आल्यानं संपूर्ण रस्ता चिखलमय झालाय. या मार्गावरून प्रवास करणं जीवघेणं ठरत आहे.

Parali roads

अनेक वेळा मागणी करूनही रस्त्याचे काम झालेलं नाही. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आलाय. सदरील रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावं अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय. अनेक गाव खेड्यांना हा रस्ता जोडला गेलाय. इथे दुग्ध व्यवसायिक जास्त असल्याने या रस्त्यावरून कसरत करत त्यांना प्रवास करावा लागतोय.

बीड शहरातील रस्तेही खड्डेमय

दरम्यान, बीड शहरातील मुख्य बाजारपेठ अससलेल्या सुभाष रोड लगतल्या रस्त्यावरही अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतुकीसाठी अडथळे येत आहेत. बीड पोलीस ठाण्यापासून डीपी रोड ते जिजामाता चौकापर्यंतच्या रस्त्यावर अनेक दिवसांपासून लहान-मोठे खड्डे पडले आहेत. पालिकेच्या वतीने मध्यंतरी खड्डे बुजवण्याचं काम करण्यात आलं. मात्र गेल्या काही दिवसात पडलेल्या पावसामुळे पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. खड्ड्यातील पाणी वाहनांमुळे पायी चालणाऱ्या लोकांच्या अंगावर जाते. यामुळे अनेक वादही उद्भवतात. बीड शहरातील सुभाष रोड कॉर्नर ते जिल्हा स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्यांचीही अशीच अवस्था झाली आहे. यामुळे लहान-मोठ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.