Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी जातीय तणाव कमी करण्यासाठी आणि समतेचा संदेश देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सर्व पोलिसांच्या नेमप्लेट आणि टेबलवरील आडनाव काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
beed police
Follow us
| Updated on: Mar 13, 2025 | 2:06 PM

बीडमध्ये सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे साामाजिक सलोखा बिघडला आहे. याच कारणामुळे आता बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. बीडमध्ये पोलिस अधीक्षकांपासून कॉन्स्टेबलपर्यंत सर्वांच्याच टेबलांवरील आणि छातीवरील नेमप्लेटमधून आडनाव हटवले जाणार आहे. त्याऐवजी फक्त नावाचा वापर केला जाणार आहे.

बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी नुकताच बीडमध्ये एक नवा उपक्रम सुरु केला होता. नवनीत कॉवत यांनी पोलिसांनी एकमेकांना आडनावाऐवजी केवळ नावानेच हाक मारावी, असे सांगितले होते. यानंतर त्यांनी पोलिसांच्या छातीवर असलेल्या नेमप्लेटवरील आडनावंही हटवली होती. यानंतर आता बीड पोलिसांच्या नेमप्लेटसह टेबलावरही फक्त त्यांची नावे आणि पदं नमूद करण्यात आली आहेत. यामुळे बीड पोलिसांचे कौतुक होत आहे.

“पोलिसांनी एकमेकांना नावाने हाक मारायची”

प्रत्येक जिल्ह्यात तिथल्याच तालुक्यांमधील, गावांमधील तरुण पोलीस खात्यात भरती होत असतात. विविध समाजातील तरुण पोलिसात सहभागी होतात. ते आपापल्या जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करत असतात. आम्ही पोलीस खात्यात काम करतो. म्हणजेच देशासाठी काम करत असतो. त्यामुळे आमची कुठलीही जात नसते, आमचा कुठलाही धर्म नसतो. आम्ही कुठल्याही नागरिकाला त्याची जात अथवा त्याचा धर्म पाहून न्याय देण्याची भूमिका घेत नाही. यामुळे कर्तव्यामधून जात काढून टाकण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलं. त्यापूर्वी आम्ही पोलिसांनी एकमेकांना नावाने हाक मारायचा उपक्रम राबवला. आता पोलिसांच्या नेमप्लेटवरून आडनावं काढून केवळ नावं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली.

“तो त्याच्या जातीने, आडनावाने ओळखला जाऊ नये”

बीडमध्ये सध्या जातीय तणाव वाढला आहे. तो कमी करण्यासाठी आणि पोलीस हा केवळ पोलीस म्हणून ओळखला जावा. तो त्याच्या जातीने, आडनावाने ओळखला जाऊ नये यासाठी नवनीत कॉवत यांनी नवा पायंडा पाडला आहे. आम्हा पोलिसांची कुठलीही जात नाही. आमचा कुठलाही धर्म नाही. आम्ही सर्वांसाठी केवळ खाकी आहोत. आम्ही जेव्हा बंदोबस्तानिमित्त जिल्ह्यात फिरतो, तेव्हा अनेकजण आमच्या छातीवर असलेल्या नेमप्लेटवरील आमचं आडनाव वाचून आमच्याशी कसं वागायचं हे ठरवतात. आम्ही त्यांच्याशी कसे वागू याचा स्वतःच वाट्टेल तसा अर्थ लावतात. ते आम्हाला थांबवायचं आहे, असेही नवनीत कॉवत यांनी सांगितले.

“आम्ही सर्वांसाठी केवळ खाकी”

“आमचे पोलीस बीडच्या जनतेसाठी काम करतात. लोकांसाठी आम्ही फक्त पोलीस आहोत. माझा पोलीस अधिकारी, कर्मचारी हा जेव्हा कर्तव्यावर असतो, तेव्हा त्याच्या कामाचा आणि त्याच्या जातीचा काहीच संबंध नसतो. आम्ही सर्वांसाठी केवळ खाकी आहोत. आम्ही कायद्याप्रमाणेच वागणार”, असेही नवनीत कॉवत म्हणाले.

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?.
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?.
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.