
Laxman Hake Criticized Sharad Pawar And Ajit Pawar: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीची मोठी वाताहत झाली. इतर महापालिकांमध्ये पण त्यांना सरस कामगिरी दाखवता आली नाही. नेमका तोच धागा पकडत प्रा.लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. या निवडणुकीत ओबीसी आणि मराठा या वादाची किनार त्यांनी दाखवली. तर त्याचवेळी ओबीसी बांधवांना मोठा इशारा दिला. बीड जिल्ह्यातील परळी इथं आले असताना काय म्हणाले हाके?
ओबीसी बांधवांनी पवारांना जागा दाखवली
परभणी जिल्ह्यातील होत असलेल्या निवडणुकासाठी ओबीसी बांधवांना साथ देण्यासाठी मी जात आहे. पुणे पिंपरी चिंचवड यासह 27 महानगरपालिका मध्ये शरद पवारांच्या पक्षाला नारळही फोडता आला नाही. अजित पवारांना ही या निवडणुकीत तुटपुंजी प्रमाणात यश मिळालं. छगन भुजबळ यांची अनुपस्थिती आणि धनंजय मुंडे यांना बाजूला करून बजरंग सोनवणे आणि क्षीरसागर यांना जवळ केल्याने ओबीसी बांधवांनी यावर लक्ष ठेवले होते आणि याचाच मोठा फटका अजित पवारांना बसला. माने या न माने ओबीसी बांधवांनी अजित पवार आणि शरद पवारांना त्यांची जागा दाखवली आहे, असा टोला ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी लगावला.
ओबीसींना धोका ओळखण्याचा इशारा
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत्या एकत्र आहेत आणि एकत्र राहतील यामुळे काही फरक पडणार नाही मात्र ओबीसींना कळून चुकले की हे पक्ष आपल्या हिताचा निर्णय घेत नाहीत.जरांगे पाटलांना सपोर्ट करणारा माणूस आपला होऊ शकत नाही हे त्यांना माहित आहे. अजित पवारांनी शरद पवारांनी ओबीसी बद्दलची आपली भूमिका समोर येऊन स्पष्ट करावी. पुण्यामध्ये 41 ओबीसी पैकी 30 ते 32 जागेवर मराठा कुणबी यांनी निवडणूक लढवली आणि ते निवडून आले यावरूनच दिसून येते की ओबीसीचे आरक्षण संपले आहे. बांधवांनो आता तरी जागे व्हा, असे आवाहन हाके यांनी केले. ज्यावेळी तिकीट देण्याची वेळ येते त्यावेळी निवडून येण्याची क्षमता बघून पैसेवाल्यांना गुंडांना दादागिरी करणाऱ्यांना तिकीट दिले जाते. अजित पवार यांनी तर गुंडांना तिकीट दिली कसा तुमचा पक्ष सत्तेत येईल, असा सवाल त्यांनी विचारला.
गिरीश महाजन यांच्यावर टीका
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एखाद्या जिल्ह्याचा पालकमंत्री ज्या महामानवाने या देशाला संविधान दिलं त्या महामानवाच्या नावाचा उच्चार करत नसेल. गिरीश महाजनांनी अक्षम्य चूक केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जर तुम्ही बाबासाहेबांविषयी बोलणार नसाल तर तुम्ही नतदृष्ट आहात. कारण तुम्ही पालकमंत्री म्हणून घ्यायचे आणि या मिनिस्ट्री मध्ये काम करायच्या लायकीचे नाहीत. महाजन तुम्ही जर बाबासाहेबांचे नाव घेणार नसाल तरी चिंता करण्याची गोष्ट आहे. या भाजपने घटनेची पायमल्ली करण्याचे काम सुरू ठेवला आहे. पक्ष फोडणे लोकांना विकत घेणे हे अस करत आहात. जे पोटामध्ये आहे ते तुमच्या ओठावर आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तुम्ही ते दाखवून दिलं, अशी टीका हाकेंनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली. तुम्ही आपली चूक मान्य करा, असे ते म्हणाले.