Bhandara crime : पवनीत सायकलची पडलेली चैन लावत होती मुलगी, विनयभंग प्रकरणी आरोपीला 3 वर्षांचा कारावास

तेजस मोहतुरे

तेजस मोहतुरे | Edited By: गोविंद हटवार, Tv9 मराठी

Updated on: Aug 22, 2022 | 2:41 PM

आरोपीला अटक करून प्रकरणाचा तपास करून आरोपीविरूद्ध आरोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालय तथा विशेष न्यायालय भंडारा येथे दाखल करण्यात आले. साक्ष आणि पुराव्याच्या आधारे न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

Bhandara crime : पवनीत सायकलची पडलेली चैन लावत होती मुलगी, विनयभंग प्रकरणी आरोपीला 3 वर्षांचा कारावास
विनयभंग प्रकरणी आरोपीला तीन वर्षांचा कारावास
Image Credit source: t v 9

भंडारा : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी 43 वर्षीय इसमाला जिल्हा न्यायालयाने (District Sessions Judge) तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. पवनी तालुक्यातील निष्टी (Nishti of Pavani Taluka) प्रकाश भिवा डहारे (Prakash Bhiwa Dahare) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. हा निकाल सत्र न्यायाधीश पी. बी. तिजारे यांनी दिला आहे. मुलगी सायकलने घराबाहेर गेली. तिच्या वडिलांनी तिला शिंगाडे आणायला पाठविले होते. सायकलची चैन पडल्यानं ती चैन लावत होती. रस्त्यावर कुणीही नव्हते. प्रकाश हडारे याच्या ही बाब लक्षात आली. पोरगी एकटी असल्याचं पाहून त्यानं लगट करण्याचा प्रयत्न केला. पण, तिने त्याला विरोध केला. ती रडत रडत घरी गेली. घडलेला प्रकार सांगितला. वडिलांनी थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी प्रकाशविरोधात गुन्हा दाखल केला. न्यायालयात खटला सुरू होता. न्यायालयानं आरोपीला ती वर्षांची शिक्षा सुनावली. अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणे तरुणाला चांगलेच महागात पडले.

काय आहे प्रकरण?

पवनी तालुक्यातील निष्टी येथील मुलीच्या वडीलाने 9 नोव्हेंबर 2018 रोजी आपल्या मुलीला गावात शिंगाडे घेण्याकरिता सायकलने पाठविले होते. मुलीच्या सायकलची चैन पडल्यामुळे ती चैन लावत होती. तेवढ्यात मुलीला एकटे पाहून प्रकाश डहारे याने तिची छेळखानी केली. छेडखानी केल्याने ती घाबरत रडत-रडत सायकल घेवून घरी गेली. तेव्हा मुलगी रडत असल्याने वडिलांनी मुलीला विचारले असता घडलेला प्रकार सांगितला. आपल्या मुलीची छेडखानी केल्याचे लक्षात येताच पवनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. आरोपी प्रकाश डहारे याच्या विरूद्ध पवनी पोलिसात कलम 354 भादंवि, सहकलम 6 लैंगिक अपराध बालसंरक्षण अधिनियम 2012 सहकलम 3(1) कायदयानुसार गुन्हा नोंदविला. आरोपीला अटक करून प्रकरणाचा तपास करून आरोपीविरूद्ध आरोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालय तथा विशेष न्यायालय भंडारा येथे दाखल करण्यात आले. साक्ष आणि पुराव्याच्या आधारे न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI