भंडाऱ्यात पाणीपुरी आणि न्यूडल्स खाल्यानं 30 ते 40 जणांना विषबाधा, एका मुलीचा मृत्यू

भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील भेंडाळा गावात 30 ते 40 लोकांना विषबाधा झाल्याची शक्यता आहे. ( Bhandra food poison case )

भंडाऱ्यात पाणीपुरी आणि न्यूडल्स खाल्यानं 30 ते 40 जणांना विषबाधा, एका मुलीचा मृत्यू
भंडाऱ्यात पाणीपुरी आणि न्यूडल्स खाल्यानं विषबाधा
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 2:29 PM

भंडारा: जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील भेंडाळा गावात पाणीपूरी व नूडल्स खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विषबाधा झाल्यानं 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून तर 30 ते 40 मुलं आणि नागरिकांना उलटी, ताप व पोट दुखीचा त्रास होत आहे. राखी सती बावणे वय 12 वर्ष असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. आरोग्य विभागाचं पथक गावामध्ये दाखल झालं आहे. (Bhandara Bendala Village food poisoning after eating panipuri and noodles one girl died many suffered)

30 ते 40 जणांना विषबाधा

भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील भेंडाळा गावात 30 ते 40 लोकांना विषबाधा झाल्याची शक्यता आहे. राखी रामदास सतीबावणे या 12 वर्षीय मुलीचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला आहे. रविवारी बाजारामध्ये नूडल्स खाल्याने उलट्या आणि हगवणीचा त्रास सुरू झाला होता, त्यामुळे हा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबातील लोकांनी केला आहे. गावातील जवळ पास 30 ते 40 लोकांना ही विषबाधा झाली असून काही लोकांना सध्या उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय पवनी येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

आठवडी बाजारात पाणीपुरी आणि न्यूडल्स खाल्ले

भेंडाळा या गावात रविवारी आठवडी बाजार होता.आठवडी बाजार मध्ये पाणीपुरी आणि चायनीजचे ठेले लागले होते. ज्या लोकांनी पाणीपुरी आणि नूडल्स खाल्ले अशा सर्व लोकांना सोमवारी त्याचा त्रास जाणवू लागला. रामदास सती बावने यांच्या कुटुंबातील मुलांनी सुद्धा हे नूडस खाल्ले होते. त्यानंतर सोमवारपासून या मुलांना उलट्याचा त्रास सुरू झाला. त्यातच मंगळवारी राखी प्रकृती जास्त झाल्याने तिच्या वडिलांनी तिला उपचारासाठी पवनी येथे नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.

राखीच्या मृत्यूची बातमी गावात पसरली आणि हळूहळू ही बाब समोर आली. गावातील बऱ्याच लोकांना सध्या उलटी आणि हगवणीचा त्रास सुरूअसल्याने त्यांच्यावर घरी किंवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, नेमका किती लोकांना याचा त्रास होतो आहे. हे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही. मुलीच्या मृत्यूनंतर गावात विशबाधा झाल्याची माहिती पोलिस पाटलांनी आरोग्य यंत्रणेला दिल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जाग झाली आणि गावात दाखल झाली. आरोग्य यंत्रणा गावात पोहोचली असून प्रत्येक घरी तपासणी करून माहिती गोळा करीत आहे. ज्यांना उपचाराची गरज आहे त्या सर्वांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जात आहे.

संबंधित बातम्या:

छगन भुजबळांना कोरोना, शरद पवार क्वारंटाईन होणार का?

Gold Rate Today: शेअर बाजारातील घसरणीनंतर सोने-चांदी महागले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय?

ममता बॅनर्जींनंतर त्यांच्या कुटुंबातून केवळ ही व्यक्ती ‘मुख्यमंत्री’ पदाची दावेदार, भाजपकडून घेरण्याची तयारी

Bhandara Bendala Village food poisoning after eating panipuri and noodles one girl died many suffered

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.