Bhiwandi building collapse | भिवंडी इमारत दुर्घटनेत 38 बळी, अडीच वर्षाच्या मुलाचा शोध सुरू

भिवंडी इमारत दुर्घटनेत एका अडीच वर्षाच्या मुलाचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता पर्यंत 38 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 19 जण जखमी झाले आहेत. (Bhiwandi building collapse update )

Bhiwandi building collapse | भिवंडी इमारत दुर्घटनेत 38 बळी, अडीच वर्षाच्या मुलाचा शोध सुरू

भिवंडी-  शहरातील जिलानी इमारत सोमवारी कोसळली या दुर्घटनेला 65 तास उलटून गेले आहेत. मात्र, अजूनही एका अडीच वर्षाच्या मुलाला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 38 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 19 जण जखमी असल्याची अधिकृत माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. या मृतांमध्ये 13 पुरुष ,8 स्त्रिया ,14 वर्ष आतील 6 मुले असून 14 वर्षा वरील 11 मुलांचा समावेश आहे. (Bhiwandi building collapse update )

जिलानी इमारतीमध्ये  दुसऱ्या मजल्या वर राहणारे मोहम्मद शब्बीर कुरेशी यांचा मुलगा मुसैफ अजून सापडलेला नाही. मुसैफला शोधण्याची मोहीम सुरू आहे.  दुर्घटना घडली त्यावेळी मोहम्मद शब्बीर याने खिडकीतून उडी मारून सुटका  करुन घेतली.  शब्बीर कुरेशी यांची पत्नी परवीन वय 27 व 4 वर्षाची मरीयम यांचा मृतदेह हाती लागला आहे.

मृतांच्या संख्येंत घोळ

बचाव कार्यांमध्ये काम करणाऱ्या एनडीआरएफ ,टीडीआरएफ ,अग्निशामक दल व पोलीस यंत्रणा यांच्यात सुसूत्रता नसल्याचे दिसून आले आहे. सोमवारी दुर्घटना घडल्यापासून त्यावेळे पासून मृतांच्या संख्येत घोळ झाला आहे.

7 मृतदेह बाहेर काढले गेले असताना एनडीआरएफ पथकाने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना 10 मृतदेह बाहेर काढल्याची माहिती दिली.  त्यानंतर त्यापुढे मोजणी केल्याने आता शेवट पर्यंत एनडीआरएफ 41 मृत तर 25 जखमी असे आकडे जाहीर केले आहेत. स्थानिक नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी या दुर्घटनेत 38 मृत तर 19 जखमी असल्याची अधिकृत माहिती दिली आहे.

संबधित बातम्या:

Bhiwandi building Collapse | भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, 10 जणांचा मृत्यू

Bhiwandi building collapse | भिवंडी दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, 24 तासानंतरही बचावकार्य सुरु

(Bhiwandi building collapse update )

Published On - 10:31 pm, Wed, 23 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI