Bhiwandi Rain | भिवंडीच्या वारणा नदीत थरार, दोघे वाहून गेले, चौघे बचावले

भिवंडीच्या वारणा नदीत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन जण वाहून गेले आहेत. सुदैवाने चार जणांनी स्वतःला सावरत किनारा गाठल्याने जीव वाचला आहे.

Bhiwandi Rain | भिवंडीच्या वारणा नदीत थरार, दोघे वाहून गेले, चौघे बचावले
प्रातिनिधिक फोटो

भिवंडी : राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. भिवंडीच्या वारणा नदीत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन जण वाहून गेले आहेत. सुदैवाने चार जणांनी स्वतःला सावरत किनारा गाठल्याने जीव वाचला आहे. (Bhiwandi Warana River Two person drowning due to heavy rain)

नेमकं काय घडलं? 

भिवंडी शहरातील रोशन बाग परिसरातील सहा तरुण तालुक्यातील चिंबी पाडा येथील वारणा नदीत पोहायला गेले होते. काल संध्याकाळी चार वाजता ही घटना घडली. रोशन बाग परिसरातील सोहेल (14), शमशाद (18), मुजीब (17), तौशिब (17), किस्मत (14) आणि अरबाज (18) असे सहा मित्र मुंब्रा जाण्यासाठी दुपारी 1 वाजता घराबाहेर पडले. पण मुंब्रा येथे न जाता लाखीवली गावातून वाहणाऱ्या वारणा नदी येथे नदीत पोहोण्यासाठी आले.

भिवंडीत आधीच मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत होता. त्यामुळे नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढली होती. यावेळी या सहा मित्रांना नदीत पोहोण्याचा मोह आवरता आला नाही. त्यानंतर त्यांनी नदीत उड्या मारल्या. पण पाण्याचा अंदाज न आल्याने मुजीब शेख (16) आणि तौसीब कुरेशी (17) हे दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून बेपत्ता झाले. तर इतर चौघांनी स्वतःचा जीव वाचवत किनारा गाठला.

 शोधकार्य सुरु 

या घटनेची माहिती स्थानिकांसह भिवंडी तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच भिवंडी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पण अंधार पडू लागल्याने शोधपथकाला रात्री 9 वाजता शोध मोहिम थांबवावी लागली. मात्र बेपत्ता युवकांचा शोध पुन्हा सुरु करण्यात आला. मात्र मृतदेह हाती लागले नसून अद्याप या ठिकाणी शोधकार्य सुरु आहे.


(Bhiwandi Warana River Two person drowning due to heavy rain)

संबंधित बातम्या : 

कल्याणच्या मलंगगड परिसरात नदीत बुडून दोघांचा मृत्यू, एनडीआरएफने 24 तासांनी मृतदेह बाहेर काढले

VIDEO | कासाडी नदीत पोहायला उतरलेल्या दोघांचा मृत्यू, मृतदेहांचा शोध सुरु

Video : वीर धरणातून 21 हजार 505 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग, नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI