AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुके बोंबिल विकायचा,अचानक गायब झाला अन् एक दिवस थेट अवतार म्हणून आला… भोंदू मनोहरनं कसं उभारलं साम्राज्य?

भोंदूबाबा मनोहर भोसलेने सुके बोंबिल विकण्यापासून सुरूवात करून स्वतःला 'बाळू मामाचा अवतार' भासवून कोट्यवधींचे साम्राज्य उभारले. फसव्या योजना आणि दैवी शक्तीचे आमिष दाखवून त्याने अनेकांना लुटले. आता अटकेनंतर त्याचे एक-एक कारनामे समोर येत असून, पोलिस त्याच्या संपत्तीचा तपास करत आहेत. हे प्रकरण भोंदूगिरीचे मोठे जाळे उघड करत आहे.

सुके बोंबिल विकायचा,अचानक गायब झाला अन् एक दिवस थेट अवतार म्हणून आला... भोंदू मनोहरनं कसं उभारलं साम्राज्य?
भोंदू मनोहर भोसलेImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 26, 2026 | 1:04 PM
Share

भोंदूबाबा मनोहर भोसले याला अटक करण्यात आल्यानंतर त्याचे एक एक कारनामे आता समोर आले आहे. स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचं भासवणाऱ्या या भोंदूबाबाने अनेकांना लूटल्याचं समोर आलं आहे. केवळ सोलापूरपर्यंतच त्याचा पसारा मर्यादित नसून त्याचं मुंबईशी कनेक्शन निघाल्याचंही समोर आलं आहे. सुके बोंबिल विकायचा, एक दिवस गायब झाला अन् बाळू मामाचा अवतार म्हणून तो अवतरला. त्यानंतर त्याचा भोंदूगिरीचा खेळ सुरू झाला. या खेळात त्याने अनेकांना फसवलं आणि आपलं मोठं साम्राज्य उभारलं. नेमकं काय केलं भोंदू भोसलेने?

मूळचा इंदापूर तालुक्यातील (लासुर्णे) येथील मनोहर भोसले डीएडमध्ये नापास झाल्यावर सुके बोंबिल विकून घर चालवत होता. पण त्यातून फारशी मिळकत होत नसल्याने तो अचानक गायब झाला. काही काळ बेपत्ता राहिल्यानंतर तो गावात परतला आणि त्याने ‘मनोहर मामा’ हे नाव धारण करून भोंदूगिरी सुरू केली. त्याने स्वत:ला बाळू मामाचा अवतार म्हणून घोषित केले. भोंदूगिरीच्या पैशातून त्याने उंदरगाव, घोटी येथे थेट 27 एकरात आश्रम थाटला. हा अत्यंत अलिशान असा मठ आहे. या मठातून भोंदूगिरी करत तो कोट्यधीश बनला. पोलिस आता या संपत्तीच्या अँगलनेही तपास करत आहेत.

अमिष दाखवले…

व्यवसायात भरभराटीचे आमिष दाखवून 50 हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी त्याला पुण्यातून (मांजरी) अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता माढा न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

आश्रम बंद करण्याची मागणी

भोंदूबाबा मनोहर भोसलेवर बारामती, करमाळा, कुर्डुवाडी पोलिसात विविध गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच लोणंद ( सातारा ) आणि दौंड ( पुणे ) पोलिसांतही मनोहर भोसले विरोधात अनेक तक्रारी दाखल आहेत. सध्या मनोहर भोसले हा करमाळयाच्या जेलमध्ये आहे. घोटी गावचे सरपंच विलास राऊत यांनी घोटी येथील मनोहर भोसलेचा आश्रम बंद करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे केली आहे.

भोंदू मनोहरवर दाखल गुन्हे

2021 (बारामती) : कॅन्सर बरा करण्याच्या नावाखाली 2 लाख 51 हजारांची फसवणूक (जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा).

2021 (करमाळा) : टीव्ही मालिकेत काम देण्याच्या आमिषाने महिलेवर अत्याचार आणि आर्थिक लूट.

2026 (कुर्डुवाडी) : व्यवसायात भरभराटीसाठी 50 हजारांचा गंडा (सध्या याच गुन्ह्यात अटक). याशिवाय सातारा (लोणंद) आणि पुणे (दौंड) पोलिसांतही त्याच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल आहेत.

Follow Us
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव.
लाडकी बहिण योजने बाबत सर्वात मोठी अपडेट! अपात्र बहिणींकडून होणार वसूली
लाडकी बहिण योजने बाबत सर्वात मोठी अपडेट! अपात्र बहिणींकडून होणार वसूली.
जवळच्या व्यक्तीनेच केला खरातचा गेम! फार्महाऊसवरील नको ते व्हिडीओ गोळा
जवळच्या व्यक्तीनेच केला खरातचा गेम! फार्महाऊसवरील नको ते व्हिडीओ गोळा.
रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक, 'राजा शिवाजी'चि
रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक, 'राजा शिवाजी'चि.
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका.
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी.
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार.