भाजपाकडून एकनाथ शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम, अचानक बडा नेता फोडला; राजकारणात मोठी खळबळ!
Shivsena : भाजपने एकनाथ शिंदेना मोठा धक्का दिला आहे. एका बड्या नेत्याने भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. डिसेंबरमध्ये राज्यातील नगरपालिकांच्या आणि नगर पंचायतींच्या निवडणुका पार पडल्या होत्या. बहुतांशी ठिकाणी भाजपने विजय मिळवला होता. अशातच आता कुळगाव-बदलापूर नगरपालिकेतून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपने एकनाथ शिंदेना मोठा धक्का दिला आहे. एका बड्या नेत्याने भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. बदलापुरात नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात.
भाजपकडून शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम
बदलापूर नगरपालिकेची सत्ता काबीज केल्यानंतर भाजपने शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. शिंदेसेनेचे उपशहरप्रमुख प्रवीण राऊत यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. शिंदेसेनेत सुरू असलेली घराणेशाही मोडून काढण्यासाठीच हा पक्षप्रवेश केल्याची प्रतिक्रिया आमदार किसन कथोरे यांनी दिलीय. महत्वाचं म्हणजे प्रवीण राऊत यांची पत्नी शीतल राऊत आणि वहिनी विजया राऊत या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. तर शिवसेनेच्याच नगरसेविका दीपाली लामतुरे यांचे पती गणेश लामतुरे यांनीही शिवसेना सोडून भाजपचं कमळ हाती घेतलंय, त्यामुळे पालिकेत भाजपची ताकद वाढलीय. आता प्रवीण राऊत यांना भाजपकडून स्विकृत नगरसेवकपद दिलं जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे बदलापुरात घडामोडींना वेग आला आहे.
Municipal Election 2026
आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही - अमेय घोले
उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश
नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार
भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
कोल्हापूरात काँग्रेसला धक्का
कोल्हापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वासराव आबाजी पाटील यांनी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विश्वासराव आबाजी पाटील यांच्यासह शिरोली दुमला गावचे सरपंच सचिन पाटील, हनुमान दूध संघाचे अध्यक्ष बुद्धिराज शंकर पाटील महेकर, यशवंत सहकारी बँक कुडित्रेचे संचालक नंदकुमार अण्णासाहेब पाटील, अनिल सोलापुरे, राहुल पाटील, एस.के.पाटील, माधव पाटील, सुनील पाटील आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी यावेळी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
