AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election Result : मुंबईचा महापौर कोण, राजधानीत खलबतं, मोदींचेही सर्वात मोठे विधान; थेट म्हणाले, मुंबईत आता…

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा विजय झाला आहे. याच निवडणुकीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे विधान केले आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

BMC Election Result : मुंबईचा महापौर कोण, राजधानीत खलबतं, मोदींचेही सर्वात मोठे विधान; थेट म्हणाले, मुंबईत आता...
eknath shinde and narendra modiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 18, 2026 | 2:31 PM
Share

Narendra Modi On BMC Election Result 2026 : मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. येथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपाने एकत्र येत पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली होती. काहीही झालं तरी ही निवडणूक जिंकायची, असा निश्चयच महायुतीच्या या दोन्ही घटकपक्षांनी केला होता. दुसरीकडे मनसे आणि उद्धव ठाकरे यांनीही ऐतिहासिक युती करून मराठी अस्मितेच्या माध्यमातून वातावरण तापवले होते. परंतु आता मुंबईत महायुतीची सरशी झालेली असून महापौर निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व नगरसेवक ताज लँड्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहेत. त्यामुळेच मुंबईचा नवा महापौर कोण होणार, याबाबतच सस्पेन्स वाढला आहे. असे असतानाच आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या निकालावर मोठे भाष्य केले आहे.

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

नरेंद्र मोदी आसाम राज्यातील काझीरंगा येथे एका सभेला संबोधित करत होते. या सभेत बोलताना त्यांनी मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीवर थेट भाष्य केले. त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. “संपूर्ण देशात भाजपा हा सर्वांचा आवडता पक्ष म्हणून समोर येत आहे. गेल्या एक ते दीड वर्षांपासून लोकांचा भाजपावरील विश्वास वाढत आहे. नुकेच बिहारमध्ये निवडणुका झाल्या. तिथे लोकांनी भाजपाला विक्रमी मतं दिली,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.

मुंबईच्या निकालावर बोलताना मोदी म्हणाले की….

तसेच पुढे त्यांनी मुंबई तसेच महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणुकीवरही मोठे भाष्य केले. “दोन दिवसांअगोदर महाराष्ट्रातील मोठ्या शहरांत महापौर आणि नगरसेवक पदाच्या निवडणुका झाल्या. मुंबई हे जगातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांपैकी एक शहर आहे. त्या शहरातही जनतेने भाजपाला पहिल्यांदाच ऐतिहासिक आणि विक्रमी मतं दिली. भाजपाचा मुंबईत विजय होतोय. पण तो विजय काझिरंगामध्ये साजरा केला जातोय. महाराष्ट्रात बहुसंख्य शहरात लोकांनी भाजपालाच सेवेची संधी दिली आहे,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.

पुढे नेमकं काय होणार?

दरम्यान, मुंबईतील महानगरपालिकेच्या निवडणुकीवर थेट मोदींनी आसाम राज्यात विधानांची चर्चा होत आहे. सद्या भाजपा आणि शिवसेना यांच्यात महापौरपदाच्या निवडीवरून चर्चा सुरू आहे. असे असतानाच मोदी यांनी थेट आसाममध्ये मुंबईचा उल्लेख केल्याने भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांचेही महापौरनिवडीकडे लक्ष आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
शिवसेनेला जेमतेम 4 जागा, त्यातही... गुलाबराव पाटलांनी नराजीच्या सुरात
शिवसेनेला जेमतेम 4 जागा, त्यातही... गुलाबराव पाटलांनी नराजीच्या सुरात सगळंच सांगितलं
निवडणुकीआधीच बावनकुळेंचा मोठा दावा! सर्व बंडखोर माघार घेणार; 17 पैकी..
Chandrashekhar Bawankule | निवडणुकीआधीच बावनकुळेंचा मोठा दावा! सर्व बंडखोर माघार घेणार; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचाच विजय?
मोठी खळबळ! संजय राऊतांचा cockroach janata party च्या आंदोलनाला पाठिंबा
मोठी खळबळ! संजय राऊतांचा cockroach janata party च्या आंदोलनाला पाठिंबा?
विधान परिषद, राज्यसभा बंदच करा! संजय राऊतांचा संताप....
Sanjay Raut Press | विधान परिषद, राज्यसभा बंदच करा! संजय राऊतांचा संताप; महायुतीवर घोडेबाजाराचा गंभीर आरोप
महागाईने जनता त्रस्त; बारामतीत राष्ट्रवादीचा सरकारविरोधात एल्गार
Baramati NCP Sharad Pawar Protest | महागाईने जनता त्रस्त; बारामतीत राष्ट्रवादीचा सरकारविरोधात एल्गार
पुन्हा विलिनीकरणाच्या चर्चा! वळसे पाटील आणि शरद पवरांच्या सिलव्हर ओकवर
पुन्हा विलिनीकरणाच्या चर्चा! वळसे पाटील आणि शरद पवरांच्या सिलव्हर ओकवरील बैठकीत... राजकारणात काहीतरी मोठं घडणार?
महाजनांच्या मिशनला यश! एक भाऊ माघारीच्या तयारीत, दुसरा संपर्काबाहेर
Nashik | गिरीश महाजनांच्या मिशनला यश! एक भाऊ माघारीच्या तयारीत, दुसरा संपर्काबाहेर; नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट
विक्रम काकडेंच्या संपत्तीचीच चर्चा, चक्क पार्थ पवारांना दिलंय कर्ज
विक्रम काकडेंच्या संपत्तीची तुफान चर्चा, चक्क पार्थ पवारांना दिलंय कोट्यावधीचं कर्ज?
उदय सामंतांना जमलं नाही, आता महाजन मैदानात; बंडखोरांच्या मनधरणीसाठी...
Girish Mahajan | उदय सामंतांना जमलं नाही, आता महाजन मैदानात; बंडखोरांच्या मनधरणीसाठी थेट नाशिकला रवाना?
SIT चौकशीनंतर मोठा खुलासा; इम्तियाज जलीलांचं नाव का आलं?
Mateen Patel | SIT चौकशीनंतर मोठा खुलासा; इम्तियाज जलीलांचं नाव का आलं?, मतीन पटेलने स्पष्टच सांगितलं