AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांच टेन्शन वाढलं; सांगलीमधून मोठी बातमी, संजय काका पाटलांना धक्का

विधानसभा निवडणुकीचं वारं आता जोरात वाहू लागलं आहे. प्रचाराला देखील वेग आलाय. सांगलीच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.

अजितदादांच टेन्शन वाढलं; सांगलीमधून मोठी बातमी, संजय काका पाटलांना धक्का
| Updated on: Nov 09, 2024 | 4:15 PM
Share

विधानसभा निवडणुकीचं वारं आता जोरात वाहू लागलं आहे. प्रचाराला देखील वेग आलाय. त्यातच सांगलीच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांना राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा जाहीर केला आहे. एवढंच नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रोहित पाटील यांचा प्रचार देखील करण्यात येणार आहे. रोहित पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सांगलीच्या तासगाव-कवठेमहांकाळ विधासभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी खासदार संजय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सांगलीच्या तासगाव-कवठेमहांकाळ मधील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित आर आर पाटील यांना राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे. सांगली जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी हा पाठिंबा जाहीर केला आहे. रोहित पाटील यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या सभेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रोहित पाटील यांना पाठिंबा देत असल्याचं महेश खराडे यांनी जाहीर केलं. एवढंच नाही तर  तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रोहित पवार यांचा प्रचार देखील करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का 

दरम्यान या विधानसभा मतदारसंघात दोनही राष्ट्रवादीचेच उमेदवार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पाटील तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडू संजय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रोहित पाटील यांना पाठिंबा देण्यात आल्यामुळे या मतदारसंघात रोहित पाटील यांची ताकत वाढल्याची चर्चा आहे., मात्र दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रोहित पाटील यांना असलेला पाठिंबा हे संजय पाटील यांच्यासाठी मोठं आव्हान ठरू शकतं. या मतदारसंघातून एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी दहा उमेदवारांनी विविध पक्षांच्या वतीनं अर्ज दाखल केला आहे तर तेरा उमेदवार हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा