AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; उद्धव ठाकरेंची साथ सोडली, विमानतळावरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्यापूर्वीच आता शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे, राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; उद्धव ठाकरेंची साथ सोडली, विमानतळावरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2025 | 4:42 PM
Share

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला होता, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधून महायुतीत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे, शिवसेना ठाकरे गटातून अनेक मोठ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दम्यान आता पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटानं शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.   मुंबई विमानतळावर मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मोठ्या संख्येने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेत सामील झालेले हे सर्व कार्यकर्ते  इंडिगोचे कर्मचारी आहेत.

पक्ष प्रवेशावर सामंत याची प्रतिक्रिया 

दरम्यान यावेळी बोलताना उदय सामंत यांनी म्हटलं की, पक्ष प्रवेशापेक्षाही इथल्या इंडिगोच्या संबंधित काही आमच्या कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी होत्या. या सगळ्या कर्मचाऱ्यांची इच्छा होती की त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना न्याय मिळून देण्याची भूमिका आम्ही घेतली आहे, त्यासाठी मी इथे आलो आहे, आणि आम्हाला इथे एरपोर्टला जे कार्यालय मिळालं आहे, त्याच्या उद्घाटनासाठी  स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे येणार आहेत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणात आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत, विरोधकांकडून त्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे, यावर देखील सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ज्यांनी चुक केली नाही, त्यांना घाबरण्याचं काहीही कारण नाही. हे राजकीय आरोप आहेत.  तसं बघायला गेलं तर रामदास भाई असतील किंवा योगेशजी असतील त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःची एक चांगली प्रतिमा निर्माण केली आहे, आणि हीच प्रतिमा आता मलिन करण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे, असं यावेळी सामंत यांनी म्हटलं आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या