AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! … शेवटी मनसेचा तो नेता भाजपच्या गळाला लागलाचं, उद्या थाटात पक्षप्रवेश

कोकणातून मोठी बातमी समोर आली आहे. अलिकडेच मनसेतून हकालपट्टी करण्यात आलेले मनसेचे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर हे आता भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत.

मोठी बातमी! ... शेवटी मनसेचा तो नेता भाजपच्या गळाला लागलाचं, उद्या थाटात पक्षप्रवेश
Vaibhav Khedekar
| Updated on: Sep 03, 2025 | 9:19 PM
Share

कोकणातून मोठी बातमी समोर आली आहे. अलिकडेच मनसेतून हकालपट्टी करण्यात आलेले मनसेचे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर हे आता भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार खेडेकर हे उद्या (4 सप्टेंबर) भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. खेडेकर यांच्यासोबत त्यांचे असंख्य कार्यकर्तेही भाजपमध्ये सामील होणार आहेत. वैभव खेडेकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे कोकणात भाजपची ताकद आणखी वाढणार आहे.

वैभव खेडेकर भाजपमध्ये प्रवेश करणार

वैभव खेडेकर हे कोकणातील मनसेचे महत्वाचे नेते होते. खासकरून खेडमध्ये मनसेचा विस्तार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. महत्वाची बाब म्हणजे पक्षाच्या स्थापनेपासून खेडेकर हे राज ठाकरेंच्या सोबत होते. मात्र गेल्या काही काळापासून ते नाराज होते. काही कारणामुळे त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं होतं. त्यानंतर ते भाजपमध्ये किंवा शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली होती.

नितेश राणे काय म्हणाले?

नितेश राणे म्हणाले होते की, ‘वैभव खेडेकर यांना मी यापूर्वी ओळखत होतो. गावागावात मनसे पोहचवण्याचे काम त्यांनी केलं. पण त्यांच्या हातात अचानक मनसेमधून बडतर्फ करण्यात पत्र त्यांना पाठवण्यात आलं. वैभव खेडेकर यांना भाजपची ऑफर दिली होती. प्रदेशाध्यक्षांचा संदेश घेऊन वैभव खेडेकरांना भेटायला आलोय’ असं म्हणत 4 सप्टेंबरला रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वैभव खेडेकर आणि त्याच्या सहकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश होणार आहे असल्याची माहिती राणेंनी दिली होती.

वैभव खेडेकरांची प्रतिक्रिया

भाजप प्रवेशाबाबत बोलताना वैभव खेडेकर म्हणाले होते की, भारतीय जनता पार्टी ताकद देणार आहे. राज ठाकरेंसाठी माझ्या हृदयातला कोपरा आजही ओला आहे. मी राज ठाकरेंना हृदयातून नाही तर राज ठाकरेंनी त्यांच्या हृदयातून मला बाजूला केलं. माझ्यासोबत माझ्या सर्व समर्थकांची मला साथ आहे. यापुढे भाजपचं काम तेवढ्याच ताकदीने केला जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बडतर्फ तिन्ही जिल्हाप्रमुख यांच्यासह सर्व समर्थक सोबत आहेत. मी सामान्य कार्यकर्ता आहे, मला कोणतही राजकीय बळ नाही, कार्यकर्त्यांचं प्रेम यामुळेच माझ्यासोबत कार्यकर्ते आहेत असं खेडेकर म्हणाले होते.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.