मोठी बातमी! शरद पवारांना बसणार मोठा धक्का? पडद्यामागे घडामोडींना वेग
पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, मात्र त्यापूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला, मात्र हे यश महाविकास आघाडीला विधानसभेत टिकवता आलं नाही, महायुतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं, 232 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले, भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील चांगलं यश मिळालं, दुसरीकडे महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं.
विधानसभा निवडणुकीत झालेला पराभवानंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या देखील काही नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. त्यापूर्वी आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे लवकरच घड्याळ हाती बांधणार असल्याची मतदारसंघामध्ये चर्चा सुरू आहे. येत्या पाच ऑगस्ट रोजी राहुल मोटे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राहुल मोटे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे, मात्र अजित पवार हे व्यस्त असल्यामुळे त्यांचा प्रवेश लांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
भूम, परंडा, वाशी मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे हे आता लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. तसे झाल्यास हा राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का असणार आहे. दरम्यान या संदर्भात भूम, परंडा आणि वाशी अशा तिनही तालुक्यांमधील कार्यकर्त्यांसोबत बैठकीच्या माध्यमातून राहुल मोटे यांची पक्षप्रवेशाबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभेला शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात माजी आमदार राहुल मोटे यांनी निवडणूक लढवली होती. ते आता लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
