नितीन राऊत यांच्या ट्वीटनंतर वादंग, आता संजय राऊत म्हणाले मुख्यमंत्री स्वतः सावरकरवादी, सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…

वीर सावरकर हे वीर सावरकर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः सावरकरवादी आहेत. कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर सूर्याचं तेजचं त्याला जाळून टाकेल, असे थेट उत्तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले.

नितीन राऊत यांच्या ट्वीटनंतर वादंग, आता संजय राऊत म्हणाले मुख्यमंत्री स्वतः सावरकरवादी, सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर...
SANJAY RAUT
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 11:42 PM

नाशिक : माकड आपला पूर्वज आहे. माकडाला आपण वंशज मानलंच पाहिजे. माकड आहे म्हणून आज आपण आहोत. वीर सावरकर हे वीर सावरकर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः सावरकरवादी आहेत. कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर सूर्याचं तेजच त्याला जाळून टाकेल, असे थेट उत्तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याविषयी एक आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. या ट्विटनंतर भाजपकडून मुख्यमंत्री काय भूमिका घेणार अशी विचारणा होत होती. याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी वरील वक्तव्य केलं. ते नाशिकमध्ये बोलत होते.

सावरकरांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला गेला

माकड हा आपला पूर्वज आहे. माकडाला आपण वंशज मानलच पाहिजे. माकड आहे म्हणून आज आपण आहोत. वीर सावरकर हे वीर सावरकर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः सावरकरवादी आहेत. कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर सूर्याचं तेजच त्याला जाळून टाकेल. गेल्या असंख्य वर्षात सावरकरांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. या देशातील विशिष्ट वर्गाने सावरकरांना कायम बदनाम करण्याचा कायम प्रयत्न केला. मात्र ते महानायक राहतील, असे राऊत म्हणाले. तसेच सावरकरांचं देशातील स्वातंत्र्य लढ्यातील योगदान इतिहासातील पानांवरून कोणाला पुसता येणार नाही, असेदेखील त्यांनी निक्षूण सांगितले.

नितीन राऊत यांनी यांनी नेमकं काय ट्विट केलं होतं ?

उर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्यावर एक आक्षेपार्ह ट्विट केलं. नंतर काही क्षणात हे ट्विट व्हायरल झाले. तसेच सर्व स्तरातून राऊत यांचा निषेध केला गेला. वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नंतर नितीन राऊत यांनी हे ट्विट डिलीट केले. मात्र भाजपने आक्रमक होत राऊत यांनी माफी मागावी अशी भूमिका घेतली. राऊत यांनी माफी न मागितल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप नेते अतुल भातळखर यांनी केली होती.

इतर बातम्या :

अमरावतीत आर्थित विवंचनेतून शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या, मन सुन्न करणारी सुसाईड नोट समोर

ही तर सैतानाचा अवतार, नग्न करुन महिलेचा बळी देण्याचा प्रयत्न, रडण्याच्या आवाजाने शेजाऱ्यांचा थरकाप

‘अंबानी, RSS व्यक्तीची फाईल मंजूर करण्यासाठी दबाव होता, 300 कोटींची लाच देऊ केली’

(bjp criticizes cm uddhav thackeray on nitin raut contradictory post on savarkar sanjay raut said vir savarkar is hero)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.