AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होताच कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेना; फटाक्यांची आतषबाजी, पेढे भरवले…

BJP Leader Celebration After Narendra Modi Swearing Ceremony : एनडीए सरकारचा शपथविधी होत आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यानंतर आता ठिकठिकाणी सेलिब्रेशन केलं जात आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी उत्सव साजरा केला केला जात आहे. वाचा सविस्तर...

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होताच कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेना; फटाक्यांची आतषबाजी, पेढे भरवले...
| Updated on: Jun 10, 2024 | 12:13 PM
Share

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पुन्हा एकदा एनडीए सरकार सत्तेत आलं आहे. त्यामुळे भाजप आणि महायुतीच्या नेत्या- कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. जळगावात भाजपच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी फटाके फोडून करण्यात ‘दिवाळी’ साजरी करण्यात येत आहे. जळगाव शहरात नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त भाजप तसेच महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठा जल्लोष केला आहे. ढोल ताशांच्या गजरावर नृत्य करत भाजप तसेच महायुतीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जल्लोष व्यक्त केला आहे.

जळगावात जल्लोष

जळगाव शहरातील भाजपच्या कार्यालयात एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा बघितला जात आहे. नरेंद्र मोदी तिसरांदा पंतप्रधान होत असल्यामुळे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा आनंदाचं वातावरण आहे. दोन ताशांच्या गजरावर नृत्य करत फटाके फोडून, फटाके फोडत आतिषबाजी करण्यात येत आहे. एकमेकांना पेढे भरवत महायुतीचे पदाधिकारी यांनी मोठा आनंद आणि जलोष व्यक्त करताना पाहायला मिळत आहे.जळगाव शहरातील भाजपच्या कार्यालयात महायुतीमधील घटक पक्षामधील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येऊन हा अनुभवत आहे.

नाशिक शहरातही जल्लोष करण्यात येत आहे. नाशिकच्या भाजपा कार्यालयात नरेंद्र मोदींच्या शपतविधीचा जल्लोष करण्यात येतोय. गुलालाची उधळण करत डिजेच्या तालावर नाचून जल्लोष साजरा केला जात आहे. भाजपा कार्यालयात एलईडी स्क्रीनवर शपतविधी सोहळा बघण्यात आला. भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात बसून एलईडी स्क्रिन च्या माध्यमातून शपथविधी सोहळ्याचा आनंद घेतला.

ठाकरेंना टोला

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ ग्रहण करीत असताना वांद्रे पूर्वेतील कलानगर उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थान परिसरात रंगीत फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर डोंबिवलीत जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत शुभेच्छा दिल्या. घरडा सर्कल इथं जल्लोष साजरा करण्यात आला.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.