AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हर्षवर्धन पाटील यांचा ‘या’ तारखेला शरद पवार गटात प्रवेश, लेकीच्या व्हॉट्सअप स्टेटसची सर्वत्र चर्चा

हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे चर्चांना उधाण आले आहे. हर्षवर्धन पाटील हे लवकरच याबद्दलचा निर्णय जाहीर करणार आहेत.

हर्षवर्धन पाटील यांचा 'या' तारखेला शरद पवार गटात प्रवेश, लेकीच्या व्हॉट्सअप स्टेटसची सर्वत्र चर्चा
शरद पवार, हर्षवर्धन पाटीलImage Credit source: Facebook
| Updated on: Oct 04, 2024 | 1:12 PM
Share

Harshvardhan Patil Will Join NCP Sharad Pawar Party : विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच आता अनेक बड्या नेत्यांचे इनकमिंग-आऊटगोईंग सुरु झाले आहे. इंदापुरातील माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी चर्चा रंगली होती. त्यातच आता हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे चर्चांना उधाण आले आहे. हर्षवर्धन पाटील हे लवकरच याबद्दलचा निर्णय जाहीर करणार आहेत.

हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील-ठाकरे यांनी काल व्हॉट्सअप स्टेटस ठेवले होते. या स्टेट्सवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह ठेवले होते. त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे चर्चांवर शिक्कामोर्तब झाला होता. त्यातच आता हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या कार्यकर्ता मेळाव्यात हर्षवर्धन पाटील हे मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी त्यांच्या निर्णयावर चर्चा करणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांच्या भूमिका काय हे देखील ते समजून घेणार आहेत

राजकीय घडामोडींना वेग

यानंतर आज दुपारी हर्षवर्धन पाटील एक पत्रकार परिषद घेणार आहेत. हा पत्रकार परिषदेत ते त्यांच्या पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या भेटीनंतर इंदापुरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे आता इंदापुरातील जनसंपर्क कार्यालयात तुतारी वाजू लागल्या आहेत.

भाजपा कार्यालयाचे फलकही हटवले

तसेच इंदापुरातील भाजपा कार्यालयाचे फलकही हटवण्यात आले आहेत. तसेच भाजपचे जनसंपर्क कार्यालयावरील फोटोही हटवण्यात आले आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यालयावर असलेल्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो व कमळ चिन्ह देखील काढण्यात आले आहे.

5 किंवा 6 ऑक्टोबरला होणार पक्षप्रवेश

त्यातच आता शरद पवारांनीही मोठे संकेत दिले आहेत. हर्षवर्धन पाटील यांचे दुपारपर्यंत काय होतंय बघूया. दुपारी माझ्याकडे प्रतिक्रिया घ्यायला या, असे शरद पवार म्हणाले. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शरद पवार हे त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. दरम्यान हर्षवर्धन पाटील हे येत्या 5 किंवा 6 ऑक्टोबरला पक्षप्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. पण अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.