AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कार्यक्रमस्थळी जात असताना लिफ्टमध्ये अडकले, प्रवीण दरेकरांनी सांगितलं काय घडलं?

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर हे वसईत एका कार्यक्रमाला गेलेले असताना एका लिफ्टमध्ये अडकल्याची घटना घडली. लिफ्ट तोडून नंतर त्यांना बाहेर काढण्यात आले.

कार्यक्रमस्थळी जात असताना लिफ्टमध्ये अडकले, प्रवीण दरेकरांनी सांगितलं काय घडलं?
pravin darekar
| Updated on: Jul 20, 2025 | 7:25 PM
Share

Pravin Darekar : भाजपाचे नेते प्रवीण दरेकर वसईत असताना एका लिफ्टमध्ये अडकल्याची धक्कादायक घटना घडली. सादारण पाच ते सात मिनिटे ते लिफ्टमध्ये अडकले होते. दरेकर लिफ्टमध्ये अडकले आहेत, हे समोर येताच तिथे असलेल्या कार्यकर्त्यांनी थेट धाव घेत लिफ्ट तोडली आणि दरेकर यांना बाहेर काढले. दरम्यान, आता खुद्द दरेकर यांनीच घडलेल्या प्रसंगाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. आणखी काही मिनिटे उशीर झाला असता तर माझे काही खरे नव्हते, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी व्यक्त केली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

मिळालेल्या माहितीनुसार आज सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपूर्ण विकास मार्गदर्शन शिबिरासाठी दरेकर वसईत आले होते. साधारण चार वाजेच्या सुमारास दरेकर हॉलमध्ये आले होते. त्यावेळी ते लिफ्टमधून तिसऱ्या मजल्यावर जात होते. या लिफ्टची दहा लोकांना घेऊन जाण्याची क्षमता होती. मात्र या लिफ्टमध्ये जवळपास पंधरा लोक या लिफ्टमध्ये गेले होते. तसेच क्षमतेपेक्षा जास्त लोक या लिफ्टमध्ये गेल्यामुळे ही लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर जाण्याऐवजी थेट तळमजल्यावर गेली. त्यानंतर ही लिफ्ट अडकून पडली आणि बंद पडली. अचानकपणे लिफ्ट बंद बडल्यामुळे एकच खळबळ उडाली. वेळीच पोलीस, सुरक्षारक्षक तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लिफ्ट तोडून दरेकर यांना बाहेर काढले.

बाहेर येताच दरेकर घामाघूम

लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर दरेकर घामाघूम झाले होते. बाहेर येताच ते पाणी पिले आणि लगेच पायऱ्यांनी ते तिसऱ्या मजल्यावर गेले. सर्वांनी प्रसंगावधान दाखवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

दोन चार मिनटे उशीर झाला असता तर…

लिफ्टमध्ये अडण्याच्या घटनेनंतर दरेकर यांनी भिवंडीमधील अशाच एका गटनेची आठवण सांगितली. लिफ्ट आणि माझ्यात नेमकं काय शत्रूत्त्व आहे हे माहिती नाही. भिवंडीलादेखील मी अडकलो होतो. मी लिफ्टमध्ये अर्धा तास अडकलो. लिफ्टमध्ये आमच्या मंदाताई होत्या. मंदाताईं अस्वस्थ झाल्या होत्या. आणखी दोन चार मिनटं उशीर झाला असता तर माझं काही खरं नव्हतं, अशी हकीकत दरेकर यांनी सांगितली.

या व्यवस्थेकडे लक्ष देणं गरजेचं आहे

तसेच मी साधारण पाच ते सात मिनिटे लिफ्टमध्ये अडकलो होतो. पण मी सुखरूप बाहेर आलो. लिफ्टच्या व्यवस्थेकडे लक्ष देणं आवश्यक आहे असे मत व्यक्त करत दरेकर यांनी यात महापालिकेने लक्ष घालावं, अशी मागणी केली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.