AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा गेम होणार, भाजप प्रदेशाध्यक्षाच्या विधानाने खळबळ; शिंदे गटाला सर्वात मोठं टेन्शन

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज कल्याण येथे बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे, या वक्तव्यामुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

मोठा गेम होणार, भाजप प्रदेशाध्यक्षाच्या विधानाने खळबळ; शिंदे गटाला सर्वात मोठं टेन्शन
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 03, 2025 | 2:46 PM
Share

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळाची चाचपणी होणार? याबाबत आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढवणार याबाबत  महाविकास आघाडीचं चित्र अद्याप पुरेस स्पष्ट झालेलं नाहीये, तर दुसरीकडे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढवणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये मैत्रिपूर्ण लढती होऊ शकतात, मात्र आमच्यासाठी पहिला पर्याय हा महायुतीच असणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मात्र या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे, या बातमीमुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कल्याणमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, यावेळी ते बोलत होते. या पक्षप्रवेशावेळी भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन देखील करण्यात आलं.

यावेळी बोलताना  रवींद्र चव्हाण यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत.  कल्याण डोंबिवलीला लागलेलं विकासाचं ग्रहण दूर करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीचा महापौर येणे अत्यंत गरजेचे आहे,  कल्याण डोंबिवली भाजपमय करायचे आहे त्यासाठी सगळ्यांनी जोमाने कामाला लागा, असं रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाची देखील मोठी ताकद आहे. मुख्यमंत्र्यांकडून महापालिका निवडणुका या महायुती म्हणून लढवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र दुसरीकडे आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या  वक्तव्यामुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.