AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगर परिषद निवडणुकीत भाजपाची रेकॉर्डब्रेक कामगिरी; किती जागा जिंकल्या? फडणवीसांनी सांगितला आकडा

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून, पक्षानं रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे, यावर आता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नगर परिषद निवडणुकीत भाजपाची रेकॉर्डब्रेक कामगिरी; किती जागा जिंकल्या? फडणवीसांनी सांगितला आकडा
देवेंद्र फडणवीस Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Dec 21, 2025 | 7:05 PM
Share

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं आहे . राज्यात महायुतीचे एकूण 213 नगराध्यक्ष विजयी झाले आहेत, तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळवता आलेलं नाहीये, महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे, भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान या निवडणुकीत झालेल्या विजयानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली आहे, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत, तसेच विरोधकांवर जोरदार हल्लाबोल देखील केला आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस? 

या निवडणुकीमध्ये भाजपचे 129 नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. तर युतीचे 74 टक्क्यांपेक्षा अधिक नगराध्यक्ष निवडून आले आहेत. भाजपचे नगरसेवक 2017 मध्ये नंबर एक होतो. 1602 नगरसेवक होते. आता 3395  नगरसेवक निवडून आले आहोत. 48 टक्के भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. आम्हाला प्रचंड मोठं जनसमर्थन मिळालं आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या पक्षानेही चांगला परफॉर्मन्स दिला आहे. आम्ही एक प्रकारे विधानसभेचा परफॉर्मन्स याठिकाणी कायम ठेवला आहे . रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात पहिली निवडणूक होती. या निवडणुकीत मोठं यश मिळालं, त्यासाठी त्यांचं मी अभिनंदन करतो, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्या पुढे बोलताना ते म्हणाले की,  मंत्री आणि कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली. पक्ष आणि संघटनेत चांगला संवाद निर्माण झाला. त्यामुळे अभूतपूर्व विजय मिळाला आहे. 2017 पेक्षाही मोठा विजय मिळाला आहे. गेल्या 20-25 वर्षांमध्ये राज्याच्या इतिहासात इतका मोठा विजय कुणाला मिळाला नसेल. एवढा मोठा विजय आम्हाला मिळाला. मी नागरिकांचे आभार मानतो. या निवडणुकीत मी सकारात्मक प्रचार केला, असंही यावेळी फडणवीस म्हणाले, दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे, विरोधक निवडणुकीत प्रचारासाठी बाहेरच पडले नाहीत, त्यामुळे ते आता म्हणतील आम्ही ही निवडणूक फार गांभीर्यानं घेतली नव्हती असा टोला यावेळी फडणीस यांनी लगावला आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?