Maharashtra Election News LIVE : महायुतीला मुंबई महापालिकेत स्पष्ट बहूमत मिळाल्यानंतर नेत्यांची उद्या महत्वाची बैठक
देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल... नाशिक महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर मनसेकडून आत्मपरीक्षणाला सुरुवात झाली आहे.... अशा राजकीय बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळेल...

KDMC निवडणुकीनंतर शिंदे गटाकडून ठाकरे गटासोबत सातत्याने संपर्क ठेवण्याचा प्रयत्न होत आगे. ठाकरे गटाचे 9 नगरसेवक अज्ञातस्थळी असल्याची माहिती मिळाली आहे. महापौर बसवण्यासाठी शिंदे गटाला 9 नगरसेवकांची गरज असून फोडाफोडीचे प्रयत्न सुरू आहे. तर ठाकरे गटाचे तीन नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असून उरलेले नगर सेवक अज्ञातस्थळी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दबाव टाळण्यासाठी व एकजूट दाखवण्यासाठी ठाकरे गटाचे नगरसेवक ‘सेफ लोकेशन’वर असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पुढील काही दिवसांत KDMC मध्ये मोठ्या राजकीय नाट्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर मनसेकडून आत्मपरीक्षणाला सुरुवात झाली आहे. पराभवाची कारणे, प्रचारातील उणिवा आणि भविष्यातील रणनितीवर सविस्तर मंथन करण्यात येत आहे. निवडणुकीचा आढावा राज ठाकरे यांच्याकडे पाठवला जाणार आहे. राज ठाकरे लवकरच सर्व उमेदवारांची प्रत्यक्ष भेट घेणार अशी माहिती देखील समोर आली आहे. राजकारणासोबत चोरीची मोठी घटना देखील समोर येत आहे. एडवोकेट असीम सरोदे यांच्या निवासस्थानातील चंदनाच्या झाडाची चोरी झाली आहे. पोर्श कारमधून येत तीन चोरट्यांनी रात्री चंदनाच्या झाडाची चोरी केली. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल…
LIVE NEWS & UPDATES
-
डोंबिवलीमध्ये भंगार व्यावसायिकाला मारहाण
डोंबिवली देसले पाडा परिसरातील धक्कादायक घटना
दुकानाबाहेर भंगार ठेवल्याच्या वादातून भंगार व्यावसायिक व वडिलांवर दांडक्याने हल्ला
संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद
सागर कोटकर व दोन अनोळखी व्यक्तींनी भंगार व्यावसायिक पंकज मौर्या व त्यांचे वडील विनोद मौर्या यांना केली मारहाण
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीसाठी भाजप, शिवसेनेची बैठक
छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीसाठी भाजप, शिवसेनेची बैठक
महापालिका निवडणूक शिवसेना शिंदे गट आणि भाजपनं वेगवेगळी लढवली
आता महापालिका निवडणुकीचा निकाल लागताच युतीसाठी हालचालींना वेग
या बैठकीसाठी दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती
-
-
नांदेडमध्ये उसाच्या फडात आढळले बिबट्याचे पिल्लं
नांदेडमध्ये उसाच्या फडात आढळले बिबट्याचे पिल्लं
नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील मुगट शिवारात आढळले बिबट्याचे पिल्लं
बिबट्याचे पिल्लं आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण
वन विभागाकडून बिबट्याचे पिल्ल रेस्क्यू
-
मलकापूर पोलिसांकडून 46 लाख रुपयांची रोकड जप्त
मलकापूर पोलिसांनी तब्बल 46 लाख रुपयांची रोकड पकडली
मलकापूर शहरात नाकाबंदीदरम्यान आढळली दोन कारमध्ये रोकड
मध्यप्रदेशमधील खंडवावरून जिल्ह्यात येत होती कारने रोकड
दोन्ही कारचे चालक पोलिसांच्या ताब्यात, चौकशी सुरू
-
उद्धव ठाकरे यांची सेना आता मुंबईपुरता उरली: किरीट सोमय्या
उद्धव ठाकरे यांची सेना आता , मुंबईपुरता उरली आहे. राज ठाकरे यांना देखील त्यांच्याच मोठ्या भावाने संपवलं, असं भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी डिवचलं. पार्टी जिवंत ठेवण्यासाठी आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत वेगवगेळी वक्तव्य करत राहतील. उद्धव ठाकरे गटाचे एक तृतीयांश नगरसेवक जे निवडून आले आहेत, ते देखील वोट जिहाद मुळे निवडून आले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
-
-
महायुतीला मुंबई महापालिकेत स्पष्ट बहूमत मिळाल्यानंतर नेत्यांची उद्या महत्वाची बैठक
मुंबई महापालिका निकालानंतर स्पष्ट बहूमत मिळाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांची उद्या महत्वाची बैठक पार पडणार आहे. मंगळवारी सकाळी सत्ता स्थापनेची महत्वाची बैठक होणार असल्याची माहीती आहे. शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यात ही बैठक होणार असल्याची माहीती आहे. या बैठकीला भाजपचे वरिष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे आणि पराग अळवणी उपस्थित रहाणार आहेत.
-
सुलतानपूर कोर्टाने राहुल गांधींना 20 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश
सुलतानपूर न्यायालयाने राहुल गांधींना 20 फेब्रुवारी रोजी मानहानीच्या खटल्यात हजर राहण्याची अंतिम संधी दिली आहे. भाजप नेते विजय मिश्रा यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर आठ वर्षांपूर्वी कर्नाटक निवडणुकीदरम्यान अमित शहा यांच्याविरुद्ध केलेल्या अपमानास्पद टिप्पणीशी संबंधित हा खटला आहे. न्यायालयाने त्यांना वैयक्तिक जबाब नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. राहुल गांधी सध्या जामिनावर आहेत.
-
युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे भारतात आगमन
संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे भारतात आगमन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः त्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहोचले.
-
मुंबई महापालिकेचा महापौर महायुतीचाच असेल हे स्पष्ट आहे: मुंबई भाजप
मुंबई भाजपचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी म्हणाले, “महापौर महायुतीचाच असेल हे स्पष्ट आहे. आता, संजय राऊत याबद्दल काय बोलत आहेत हे सर्वांना स्पष्ट आहे; कोणीही राऊत यांना गांभीर्याने घेत नाही. राऊत काय म्हणतात किंवा करतात हे सांगता येत नाही. ते दावा करतात की शिंदे यांच्या नगरसेवकांना ताज लँड्स एंड येथे तुरुंगात टाकण्यात आले आहे, परंतु सर्व नगरसेवक एका कार्यशाळेत आहेत.”
-
काँग्रेसचा केवळ भाजपला नव्हे तर विकासाला विरोध – भागवत कराड
छत्रपती संभाजीनगरमधील पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री भागवत कराड म्हणाले की, ‘प्रत्येकाला रोजगार मिळाव म्हणून विकसित भारत रोजगार व उपजीविका हमी अभियान कायदा आणला. या कायद्याला काँग्रेसने विरोध केला आहे. काँग्रेसचा केवळ भाजपला विरोध नाही तर विकासाला विरोध आहे. काँग्रेसने देखील यातील त्रुटी दूर केल्या होत्या, आताच्या सरकारला देखील वाटले काही त्रुटी दूर केल्या आहेत.
-
मुंबई महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर होणार – एकनाथ शिंदे
शिवसेना आणि भाजप हे मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र निवडणूक लढले असून मुंबईत महायुतीचा महापौर होईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यासह महायुती म्हणून जिथे जिथे एकत्र निवडणूक लढलो त्याठिकाणी महायुतीचाच महापौर बनवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
-
सांगली : भाजप जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढवणार
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आता रणधूमाळी सुरू झाली आहे. भाजपाकडून स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली असून भाजपाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. सांगलीमध्ये जिल्हा परिषदेच्या 61 गट आणि पंचायत समितीच्या 122 गणासाठी भाजपाच्या मुलाखती पार पडल्या. भाजप आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मुलाखतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी तब्बल 876 जणांनी मुलाखती दिल्या आहेत.
-
माजलगाव : कारखान्याची काजळी आणि घाण पाणी मानवी जीवनासाठी घातक, पंकजा मुंडे यांना निवेदन
बीडच्या माजलगाव तालुक्यातील जय महेश शुगर इंडस्ट्रीज या साखर कारखान्याची धुराची काजळी सर्वत्र पडत आहे, तसेच मळीयुक्त घाण पाणी उघड्यावर सोडले जात आहे. या गोष्टी मानवी जीवनासाठी आणि प्राण्यांसाठी घातक ठरत आहे. त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. डोळ्याचे, श्वसनाचे गंभीर आजार होत आहेत. या प्रदूषणावर आळा घालावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन शेजुळ यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
-
यशवंत किल्लेदार यांची गटनेतेपदी निवड
मनसेचे मुंबई महानगरपालिकेत 6 नगरसेवक निवडून आले. यशवंत किल्लेदार यांची गटनेतेपदी निवड झाली. याबाबतची माहिती किल्लेदार यांनी यशवंत किल्लेदार यांनीच दिली.
“आताच पक्षाची बैठक झाली. आम्ही 6 नगरसेवक आणि नेत्यांच्या उपस्थितीत ठराव केले. माझी गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. याची पुढची प्रक्रिया उद्या पार पाडू” , असं किल्लेदार म्हणाले.
“आमच्याकडून कोणताही प्रतिज्ञा पत्र घेतलेलं नाही. आम्ही सर्व 6 नगरसेवक नोंदणीसाठी उद्या कोकण भवनला जाणार आहोत”, असंही किल्लेदार यांनी नमूद केलं.
-
ओबीसींना दूर ठेवणार असाल तर हाती भोपळा येईल : लक्ष्मण हाके
राज्यात झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांना रणांगणात उतरवलेच नाही. ही माणसं निवडणुकीपासून दूर होते म्हणूनच अजित दादाची राष्ट्रवादी संपली अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
-
शहादातील नवलपूर आश्रम शाळेत विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी, व्हीडिओ व्हायरल
शहादा तालुक्यातील नवलपूर आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या हाणामारीच्या व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्यार्थ्यांची हाणामारी होत असताना शिक्षक किंवा कुठलाही कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत नसल्याचं पाहायला मिळत आहे.
विद्यार्थ्यांनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारून गंभीर जखमी केलं आहे. विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी कुठल्या कारणावरून झालं हे मात्र समजू शकलेलं नाही आहे. मात्र या सर्व प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. आता या हाणामारीनंतर प्रकल्प कार्यालय काय कारवाई करते याकडे लक्ष लागलं आहे..
-
करमाळ्यात आगामी निवडणुकीसाठी भाजप-राष्ट्रवादी दादा गटाची युती, सूत्रांची माहिती
करमाळा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी- राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती झाल्याची माहिती सूत्रांकडू मिळाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल,भाजप नेते दिग्विजय बागल आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांची युती झाल्याची माहिती आहे.
-
काँग्रेसच्या नगरसेवकांचा एक गट आमच्या संपर्कात; भाजप नेत्याचा दावा
काँग्रेसच्या नगरसेवकांचा एक गट आमच्या संपर्कात; भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा खळबळजनक दावा. काँग्रेसच्या नगरसेवकांना देखील आम्हीच विकास करू शकतो असं वाटत असल्यामुळे ते आमच्या संपर्कात, मात्र भाजप सोबत जाण्यास तयार असलेला गट मोठा असावा यासाठी संपर्कात असलेले काँग्रेस नगरसेवक वाट पाहत असल्याची आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याची मुनगंटीवार यांची माहिती दिली आहे.
-
सोलर लावून देण्याची बतावणी करत शेकडो ग्राहकांची फसवणूक
अमरावतीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलर लावून देण्याची बतावणी करत शेकडो ग्राहकांची फसवणूक झाली आहे. अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांसमोर महिलांनी दिला सोलर संचालकाला चांगलाच चोप.
-
४५ दिवसापर्यंत अंबरनाथच्या विषय समित्यांना उच्च न्यायालयाची स्थगिती
उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना अधिकृत गटाबाबत निर्णय घेण्यात सांगितले आहे.45 दिवसापर्यंत अंबरनाथच्या विषय समित्यांना उच्च न्यायालयाची स्थगिती दिली आहे. अंबरनाथ विकास आघाडी आणि शिवसेना अंबरनाथ महायुती दोन्ही गट स्थगित केले आहेत.
-
शिवसेनेचे सर्व नगरसेवक उद्या 11 वाजता कोकण भवनात जाणार
शिवसेनेचे सर्व नगरसेवक उद्या 11 वाजता कोकण भवनात जाणार आहेत. शिवसेना नगरसेवकांचा ताज लँड्स अँड हाॅटेलमध्ये मुक्काम 1 दिवस आणखी वाढणार. उद्या सर्व नगरसेवक कोकण आयुक्तांच्या भेटीसाठी गाडीतून एकत्र रवाना होणार आहेत.
-
पिंपरी चिंचवड शहरात निवडून आलेल्या नगरसेवकांची अजित पवारांसोबत बैठक
अजित पवार पिंपरी चिंचवड शहरात निवडून आलेल्या नगरसेवकांसोबत बैठक घेत आहेत. यापूर्वी त्यंनी पुण्यातील नगरसेवकांशी चर्चा केली होती. पिंपर चिंडवड शहरातील सर्व नगरसेवक बैठकीसाठी उपस्थित आहेत. पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 37नगरसेवकांचा विजय झाला असून या सर्व नगरसेवकांना अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत.
-
चंद्रपूर – ठाकरे गटाला कोणत्याही परिस्थितीत महापौर पद देणार नाही, वेळ पडली तर विरोधी पक्षात बसू – सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर : शिवसेना उबाठाला कुठल्याही परिस्थितीत महापौर पद देणार नाही, वेळ पडली तर भाजप विरोधी पक्षात बसेल असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. शिवसेनेच्या महापौर पदाच्या मागणीवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सेनेच्या महापौरला थेट विरोध दर्शवला आहे.
-
29 महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षण सोडतीची तारीख अखेर जाहीर
राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षण सोडतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने यासंदर्भात अधिकृत पत्र जारी केलं असून राज्यातील 29 महानगरपालिकांतील महापौर पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. याची तारीख समोर आली असून येत्या गुरूवारी, 22 तारखेला सकाळी 11 वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात ही सोडत होणार आहे.
नगर विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडणार असून, संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सोडतीकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
-
त्या नऊ नगरसेवकांवर विनायक राऊत यांचं लक्ष
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील नऊ नगर सेवक अज्ञातस्थळी. एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असलेले दोन्ही नगरसेवक पुन्हा ठाकरेंच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती. विशेषत: अज्ञातस्थळी असलेल्या नगरसेवकांवर विनायक राऊत लक्ष ठेऊन असल्याची माहिती.
-
आग विझवायला निघालेल्या फायरब्रिगेडच्या गाडीची धडक, एकाचा मृत्यू
पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना समोर आलीय. आगीच्या आपत्कालीन कॉलवर वेगाने जात असलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अग्निशमन दलाच्या वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना पुनावळे परिसरातील अरुंद आणि खराब अवस्थेतील गायकवाड नगर रस्त्यावर घडली.
-
कल्याण–डोंबिवलीत ठाकरे बंधूंचे नगरसेवक ठरणार ‘गेम चेंजर’
कल्याण–डोंबिवलीत ठाकरे बंधूंचे नगरसेवक ‘गेम चेंजर’ ठरणार आहेत. महायुतीला बहुमत असूनही महापौर पदावरून भाजप–शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. भाजप 50 तर शिवसेना 53 जागांवर असून दोन्ही पक्षांकडून स्वबळाची तयारी सुरू आहे. भाजपला 12 तर शिवसेनेला 9 नगरसेवकांची गरज आहे.
इतर पक्षांतील नगरसेवक फोडण्यासाठी बार्गेनिंग सुरू आहे. KDMC मध्ये ठाकरेचे 11 मनसेचे पाच काँग्रेसचे 2 राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 1 असे 19 नगरसेवक आहेत. यात शिंदे गटाचा ठाकरे गटाच्या 3 नगरसेवकांशी संपर्कात तर मनसे देखील देखील शिंदे ला पाठिंबा देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
-
पुण्यात निवडून आलेले नवनिर्वाचित सर्व नगरसेवक अजित पवारांच्या भेटीला
पुणे महापालिकेत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भेटण्यासाठी बोलावलं आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी आले आहेत.
-
आजच महापालिका निवडणुकीनंतरचं गॅझेट काढा, शासनाच्या नगरविकास विभागाचे आदेश
आजच महापालिका निवडणुकीनंतरचं गॅझेट काढा, असे आदेश शासनाच्या नगरविकास विभागाने दिले आहेत. पालिका प्रशासन गव्हर्नमेंट प्रिंटींग प्रेसला जाऊन गॅझेट काढणार असून गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय पक्षांना नोंदणी करावी लागते. यासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणींनी माहिती दिली आहे.
-
पालिका निवडणुका होत नाही तोच, स्विकृत नगरसेवकपदासाठी पक्षात लॉबिंग सुरू
पालिका निवडणुका होत नाही तोच, नामनिर्देशित (स्विकृत) नगरसेवकपदासाठी पक्षात लाॅबिग सुरू झाली आहे. २२७ निवडून आलेले तर १० नामनिर्देशित सदस्य असे एकूण २३७ नगरसेवक सभागृहात उपस्थित असणार आहेत. नामनिर्देशित सदस्य मिळावे यासाठी इच्छुकांनी पक्षश्रेष्टींसाठी मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे.
निवडून आलेल्या नगरसेवकांच्या आकडेवारीनुसार भाजपला स्विकृत नगरसेवक ४ शिवसेना शिंदे गटाला १, ठाकरेंना २ मनसेने पाठिंबा दिल्यास ३ आणि अपक्षांनी काॅग्रेसला पाठींबा दिला तर ३ त्यांना मिळू शकतात. आता पालिका मुख्यालयातील सभागृहाची आसन व्यवथा २२७ ची असून १० नामनिर्देशित सदस्य वाढल्याने त्यांची आसन व्यवस्था करायची कुठे असा प्रश्न प्रशासनाला सतावत आहे.
-
हाॅटेल ताजमध्ये नगरसेवकांची एकमेकांशी चर्चा
मुंबईच्या हाॅटेल ताजमध्ये नगरसेवकांची एकमेकांशी चर्चा सुरू आहे. आज सर्व नगरसेवकांना त्यांचे पुरावे पुढील नियोजनासाठी सादर करायचे आहेत. रजिस्टर नोटरी, आधार, पॅन कार्ड, निवडणुक आयोग सर्टिफिकेट हे सर्व पुरावे सादर करायचे आहेत.
-
नाशिकमधल्या पिंपळगाव मोर इथं चारचाकी आयशर ट्रक स्लिप झाल्याची धक्कादायक घटना
नाशिकमधल्या पिंपळगाव मोर इथं चारचाकी आयशर ट्रक स्लिप झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यावरील दुचाकीस्वाराला वाचवताना ट्रक चालकाचा ताबा सुटला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या वाळूमुळे स्लिप होत थेट दुकानांमध्ये ट्रक घुसला. या अपघातात दोन जण जखमी झाले आणि एका दुकानाचं मोठं नुकसान झालं. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
-
मनपा निवडणुकीनंतर MIM ने जिल्हा परिषद निवडणुकीकडे वळवला मोर्चा
छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीत भाजपपाठोपाठ एमआयएमने 33 जागा जिंकत मोठा विजय मिळवला. आता एमआयएमने आपला मोर्चा जिल्हा परिषद निवडणुकीकडे वळवला आहे. आज एमआयएमच्या वतीने जिल्हा परिषद निवडणूकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. एमआयएमच्या दुवा फाउंडेशन इमारतीत मुलाखती पार पडणार आहेत.
-
दोन गटातच फोडाफोडी होणार – संजय राऊत
आम्ही जेवायला जातो की ते कुठे जेवायला जातात, ते बघूया. काँग्रेसचे नगरसेवक फुटणार नाही. त्यामुळे आता फोडाफोडीचा खेळ शिंदे-भाजप यांच्यातच होणार. या दोन गटातच फोडाफोडी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अजून मज्जा येणार आहे, असा दावा संजय राऊतांनी केला आहे
-
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजित पवारांचा ॲक्शन मोड; बारामती हॉस्टेलवर इच्छुकांची मोठी गर्दी
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक असताना, अजित पवार यांनी पुण्यातील बारामती हॉस्टेलवर तळ ठोकला असून आज दिवसभर ते महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत. जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील शेकडो इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी त्यांना भेटण्यासाठी हॉस्टेलवर दाखल झाले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी कोणाला मिळणार आणि पक्षाची रणनीती काय असेल, याबाबत अजित पवार थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधून निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामुळे बारामती हॉस्टेल सध्या राजकीय हालचालींचे केंद्र बनले आहे.
-
नाशिकमधील AB फॉर्म वादाची होणार चौकशी, 2 सदस्यांची समिती नियुक्त
नाशिक महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ७२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले असले, तरी पक्षाने आता पराभूत झालेल्या जागांकडे आपला मोर्चा वळवला आहे. अंतर्गत वाद आणि नियोजनातील त्रुटींमुळे हक्काच्या २० जागा गमवाव्या लागल्याचा प्राथमिक निष्कर्ष पक्षाने काढला असून, त्याचे सखोल अवलोकन केले जाणार आहे. विशेषतः उमेदवारी अर्ज भरताना झालेला AB फॉर्म’चा गोंधळ आणि पक्षांतर्गत झालेल्या बंडाळीची चौकशी करण्यासाठी दोन जणांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती आपला गोपनीय अहवाल थेट मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार आहे. ज्या पदाधिकाऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले किंवा तटस्थ राहून नुकसान केले, त्यांच्यावर या अहवालानंतर कठोर कारवाईचे संकेत मिळत असल्याने नाशिक भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
-
नगरसेवकांना डांबून का ठेवलं, याचं उत्तर द्या; संजय राऊतांचा खोचक टोला
आमचे नगरसेवक हे आपआपल्या घरी आहे. त्यांची बैठक मातोश्रीवर होते. ते आपपल्या गाडीने येतात आणि निघून जातात. तुमच्या नगरसेवकांना डांबून का ठेवलं गेलं, याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला.
-
आधी सत्तेतून बाहेर पडा, मगच एकत्र येण्याचं बोला, उत्तम जानकरांचा कडक पवित्रा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चेवर शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी पंढरपुरातून आक्रमक भूमिका मांडली आहे. अजित पवार सत्तेत असेपर्यंत राष्ट्रवादी एकत्र येणे शक्य नाही, असे सांगितले. सत्तेत असताना एकत्र येणे म्हणजे बिर्याणीत गुळवणी ओतल्यासारखे होईल,” अशी बोचरी टीका केली. जर एकत्र यायचे असेल, तर अजित पवारांना आधी सत्तेतून बाहेर पडणे अनिवार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, अजित पवार गटाकडे कोणतेही ठोस व्हिजन नसल्याचा आरोप करत जानकरांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरही सवाल उपस्थित केले. ईव्हीएमची तपासणी आणि प्रोग्राम पारदर्शकपणे दाखवला नाही, तर सोलापूर जिल्ह्यात निवडणूक होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिला.
-
धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक: अर्ज भरण्यासाठी शेवटचे ३ दिवस, युती-आघाडीचा पेच कायम
धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता केवळ तीन दिवस उरले आहेत. मात्र राजकीय वर्तुळात अद्याप जागावाटपाचा घोळ मिटलेला नाही. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये जागांच्या गणितावरून संभ्रम कायम असून, शिवसेनेत तर दोन वेगळे मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. ५५ जिल्हा परिषद गट आणि ११० पंचायत समिती गणांसाठी आतापर्यंत १०७५ इच्छुकांनी अर्ज खरेदी केले असले, तरी अधिकृत उमेदवारी कोणाला मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीची आज एक महत्त्वाची बैठक होत असून त्यात जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
-
मुंबईत पुढील तीन दिवस थंडी असणार, तापमानात मोठी घट
मुंबईत पुढील तीन दिवस थंडीचे असणार, तापानात घट होणार आहे, आज किमान तापमान 18 अंशावर पोहोचलंय… मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव येतोय… तर या थंडीत हवेचा गुणवत्ता निर्देशांक ढासाळलाय. गुणवत्ता निर्देशांक 173 च्या घरात पोहोचलाय…पीएम 2.5 चा प्रमाण ८८ इतकं आहे तर पी एम 10 चे प्रमाण १११ वर पोहोचलं आहे
-
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना नेत्यांच्या युती करण्याच्या सूचना
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपा आणि शिवसेना युती झाली नाही आणि याचा फटका शिंदे यांच्या शिवसेनेला बसला. भाजपा 57 जागेवर तर शिवसेना फक्त 13 जागेवर निवडून आली. मात्र आता उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा परिषद निवडणूकीत शक्य तेथे भाजप सोबत युती करण्यासाठी
-
असीम सरोदे यांच्या निवासस्थानातील चंदनाच्या झाडाची चोरी
पोर्श कार मधून येत तीन चोरट्यांनी रात्री केली चंदनाच्या झाडाची चोरी. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे बघायला मिळत आहे.
-
डोंबिवलीत चोरट्याची दहशत कायम
डोंबिवली पूर्वेतील स्टार कॉलनी रोड परिसरात एकाच रात्री 4 दुकाने फोडली. स्टार कॉलनी रोड, डोंबिवली पूर्व परिसरात असलेले मेडिकल, जनरल स्टोअर व प्लायवूड दुकानांची शटर उचकटून चोरट्यांनी केली घरफोडी. दोन दुकानांतून 39 हजार रुपयांची रोकड व साहित्य चोरी. चोरीची संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद, धक्कादायक संवादही रेकॉर्ड
-
जुन्या वादातून दोन गटात हाणामारी मोठी दगडफेक…
जळगावच्या नशिराबादेत जुन्या वादातून दोन गटात हाणामारी होऊन दगडफेकीची घटना. घटनेत दोन्ही गटांकडून दगड व विटांचा तसेच लाठ्याकाठ्या, पाइप, कुन्हाडीचा वापर झाल्याने तब्बल १६ जण जखमी. जखमींना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.नगरपरिषदेच्या निवडणुकीतील कामावरून झालेले वाद उफाळल्याने दोन गटात तुफान हाणामारी दगडफेक झाल्याची माहिती. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ टाळला.
-
नाशिक – पाण्याच्या टाकीत पडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू
पाण्याच्या टाकीत पडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोसायटीत झाकण नसलेल्या पाण्याच्या टाकीत पडून सहा वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला आहे. सातपूरच्या कामगारनगर परिसरातील गौरव सोसायटीत घडली घटना आहे. कुशल जितेंद्र जैन असे सहा वर्षीय मृत बालकाचे नाव आहे. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
-
नाशिक महानगरपालिकेत सुधाकर बडगुजर सर्वाधिक मतांनी विजयी
नाशिक महानगरपालिकेत सुधाकर बडगुजर सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत. सुधाकर बडगुजर यांना 14 हजार 864 मतांचा लीड मिळाला आहे. नाशिक महानगरपालिकेत सगळ्यात जास्त मताधिक्य घेऊन सुधाकर बडगुजर निवडून आले आहेत. नाशिक महानगरपालिका प्रभाग 25 मध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करुन 19 हजार 634 मते मिळवली.
-
मालेगावात एमआयएमची मोठी राजकीय खेळी
मालेगावात एमआयएमची मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळत आहे. इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची एमआयएमची तयारी आहे. जातीयवादी पक्ष व शक्तींना रोखण्यावर ठाम भूमिका मांडणार. सेना-भाजपसोबत सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे. शहरहितासाठी इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी व काँग्रेससोबत एकत्र येण्याचे संकेत आहेत.
-
मैफिलमध्ये इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण
इम्तियाज जलील यांच्यासह नगरसेवकांवर पैशांची उधळण करण्यात आली. शहरात 33 नगरसेवक निवडून आल्याच्या जल्लोषात मैफिलचं आयोजन करण्यात आलं होतं. जशन-ए- महाराष्ट्र, जशन-ए-इम्तियाजच मैफिलमध्ये पैशांची उधळण करण्यात आली. नवनिर्वाचित नगरसेवकांकडून पैशांची उधळण होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप दिसून आला. यापूर्वी देखील इम्तियाज जलील यांच्यावर पैसे उधळल्याने टीका झाली होती.
-
जळगावमध्ये शासकीय आयटीआय लगत असलेल्या हातगाड्यांना पहाटे 3 वाजता आग लागल्याची घटना घडली
जळगावमध्ये शासकीय आयटीआय लगत असलेल्या हातगाड्यांना पहाटे 3 वाजता आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत चार हातगाड्या तसेच टेबल, खुर्च्या पूर्णपणे जळून खाक झाल्या असून हातगाडी चालकांचे मोठे नुकसान झालं आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी टवाळाखोरांनी आग लावल्याचा संशय हातगाडी मालकांनी व्यक्त केला आहे.
Published On - Jan 19,2026 8:36 AM
