AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेट्रो कारशेडचा प्रकल्प बारगळणार?, कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवण्याचे आदेश

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. (Bombay High Court stays the Metro car shed project at Mumbai's Kanjur Marg)

मेट्रो कारशेडचा प्रकल्प बारगळणार?, कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवण्याचे आदेश
| Updated on: Dec 16, 2020 | 12:51 PM
Share

मुंबई: कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. (Bombay High Court stays the Metro car shed project at Mumbai’s Kanjur Marg)

कांजूर कारशेड प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवण्याचे आदेश दिले. तसेच परिस्थिती जैसे थे ठेवण्याचेही आदेश कोर्टाने दिले आहेत. हे आदेश देतानाच कोर्टाने येत्या फेब्रुवारीत या प्रकरणावर अंतिम सुनावणी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कोर्टाचा आजचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.

अहंकरापोटी निर्णय: सोमय्या

कोर्टाच्या या निर्णयावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मेट्रोच्या प्रकल्पावरून भाजपने कधीही राज्य सरकारला कोंडीत पकडले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हम करे सो कायदा या उक्तीप्रमाणे वागत होते. त्यांनीच हा प्रकल्प आरेतून कांजूरला नेला. केवळ अहंकारातून हा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबईकरांना मेट्रोसाठी पाच वर्षे वाट पाहावी लागणार असून पाच हजार कोटींचा अतिरिक्त भुर्दंडही सोसावा लागणार आहे. मात्र, कोर्टाने आज सरकारला चपराक लगावली असून आता तरी सरकारने त्यातून बोध घ्यावा, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी व्यक्त केली.

आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा

दरम्यान, कांजूरमार्ग कारशेड प्रकरणी उच्च न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा निर्णय दिल्याने सोमय्या यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या अट्टाहासापोटीच कांजूरमार्गला कारशेड हलविण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे मेट्रो प्रकल्पाला खिळ बसल्याचा दावा करतानाच मेट्रोमुळे मुंबईकराचं पाच हजार कोटींचं नुकसान झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही सोमय्या यांनी केली.

अपिलात जाणार: पवार

मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी फेब्रुवारीत सुनावणी होणार असली तरी कोर्टाच्या या निर्णयाविरोधात अपिलात जाण्याची कायद्यात तरतूद आहे. निर्णयाला विरोध करण्याचा अधिकार असल्याने आम्ही अपिलात जाऊ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. कायद्याच्या नियमातून काय सकारात्मक भूमिका घ्यायची, ती भूमिका राज्याचे प्रमुख घेतील, असंही ते म्हणाले.

कोर्टाच्या आदेशाची प्रत पाहून पुढील निर्णय घेऊ: आदित्य

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या कामाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आम्ही आदेशाच्या प्रतची वाट पाहात आहोत. त्यात कोर्टाने नेमकं काय म्हटलं हे पाहूनच पुढचा निर्णय घेतला जाईल, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. कांजूरच्या जागेमुळे सरकारचे 5500 कोटी रुपये वाचणार आहेत. या कारशेडमुळे 1 कोटी लोकांना फायदा होणार असून कांजूरची जागा मेट्रो लाईन 6, 4 आणि 14साठी अत्यंत महत्त्वाची असल्याचा दावाही त्यांनी केला.

इगोचा प्रश्न न करता आरेत काम सुरू करा: फडणवीस

कांजूर कारशेडप्रकरणी राज्य सरकारला कोर्टाने चपराक लगावली आहे. त्यामुळे सरकारने इगोचा प्रश्न न करता आरेत काम सुरू करावं, सौनिक समितीचा अहवाल मान्य कारावा. राज्य सरकारने आरेत तात्काळ बांधकाम सुरू करावं. आम्ही कोणतीही टीका करणार नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अधिकाऱ्यांनी चुकीचं ब्रिफिंग केल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी कार कारशेडच्या कामात मिठाचा खडा टाकू नये असं म्हटलं होतं, पण ते स्वत:च या कामात मिठाचा खडा टाकण्याचं काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच आरेत काम सुरू करण्यात आलं होतं. त्यासाठी शंभर कोटींचं कामही केलं होतं. पण सरकारने केवळ अहंकारापोटी निर्णय फिरवून कांजूरला कारशेड हलविण्याचा आततायी निर्णय घेतल्याची टीकाही त्यांनी केली.

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने एकही रुपया न घेता ही जागा MMRDA ला दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, आता केंद्र सरकारने या जागेत मिठागार असल्याचे सांगत त्यावर आपला हक्क सांगितला आहे. केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि व्यापार मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात कांजूरमार्गची जागा MMRDA ला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

…तर ८०० कोटींची बचत; एमएमआरडीएचा दावा

मेट्रो-3 प्रकल्पाची कारशेड कांजूरमार्गला झाल्यास प्रकल्पाच्या खर्चात तब्बल 800 कोटींची बचत होईल, असा दावा सोमवारी एमएमआरडीएच्या वकिलांनी केला. हा प्रकल्प मेट्रो—३, मेट्रो— ४ आणि मेट्रो—६ साठी असणार आहे. तीन ठिकाणी कारशेड बनवण्यासाठी २,४३४ कोटी रुपये खर्चावे लागतील. मात्र तिन्ही मेट्रोसाठी कांजूर येथे एकच कारशेड उभारण्यात येणार असल्याने ८०० कोटी रुपयांची बचत होईल. याउलट कायदेशीर कचाटय़ात सापडून ही जागा वेळेत कारशेडसाठी उपलब्ध झाली नाही, तर दिवसाला २.५२ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागेल, असेही एमएमआरडीएच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते. (Bombay High Court stays the Metro car shed project at Mumbai’s Kanjur Marg)

संबंधित बातम्या:

मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारचीच; आदित्य ठाकरेंचा दावा

भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी एकेकाळी दिलेलं शपथपत्र कसं नाकारता?, राजीव सातव यांचा केंद्राला सवाल

‘मेट्रोचं काम थांबवण्यासाठी भाजपचं कटकारस्थान’, कारशेडच्या वादावरुन नवाब मलिकांचा गंभीर आरोप

(Bombay High Court stays the Metro car shed project at Mumbai’s Kanjur Marg)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.