धरण फुटल्याचे ऐकले, लोकं सैरभैर पळू लागले, कार्यकारी अभियंता म्हणतात,…

कुणी म्हणालं कोरहाळा धरणं फुटलं. त्यामुळं लोकं सतर्क झाले. परिसरातील लोकांनी दुकानं बंद केली. प्रशासनाने धरणाकडे धाव घेतली.

धरण फुटल्याचे ऐकले, लोकं सैरभैर पळू लागले, कार्यकारी अभियंता म्हणतात,...
Follow us
| Updated on: Jul 23, 2023 | 9:22 PM

बुलढाणा : राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला. कुठं दरळ कोसळली. कुठं भूस्खलन झालं. पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. काही लोकांच्या घरात पाणी शिरले. हे सर्व ऐकल्यानंतर मनात धस्स होते. त्यात धरण फुटल्याचं ऐकल्यानंतर लोकं घाबरली. कुणी म्हणालं राजुरा धरण फुटलं. कुणी म्हणालं कोरहाळा धरण फुटलं. त्यामुळं लोकं सतर्क झाले. परिसरातील लोकांनी दुकानं बंद केली. प्रशासनाने धरणाकडे धाव घेतली. काही लोकंही नेमकं काय घडलं हे पाहण्यासाठी गेले. तिथं गेल्यानंतर कळलं की, धरणाबाहेरील भागातून पाणी जात आहे. पण, तो तेवढासा धोकादायक नाही. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले.

प्रशासनाने घेतली धरणाकडे धाव

जळगाव जामोद तालुक्यातील धरण फुटल्याची अफवा शहरासह तालुक्यात पसरली होती. कुणी म्हटले राजुरा धरण फुटले, तर कुणी म्हटले कोरहाळा धारण फुटले. धरण पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. शहरातील नागरिक सैरभैर पळू लागले. दुकाने बंद झाली होती. प्रशासनाने खरंच काय आहे म्हणून धरणाकडे धाव घेतली.

धरणाला कोणताही धोका नाही

मात्र असे काहीही नसून धरण भरले होते. त्यातील शिल्लक पाणी सांडव्याच्या रुपाने बाहेर येत होते. धरणाच्या सांडव्याने बाजूला जागा केली. त्यातून पाणी बाहेर येत असल्याचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले. तर या धरणाला कोणताही धोका नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कार्यकारी अभियंता यांनी केलं.

कोयना धरण फक्त अर्धे भरले

दुसरीकडं, पावसाचा दीड महिना उलटूनही कोयना धरण अजून अर्धेही भरलं नाही. कोयना पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाची गरज आहे. वीज निर्मिती आणि सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणाला समजली जाते. कोयना धरणात 47.76 tmc पाणीसाठा धरण झाला. धरण 44.42 % भरले आहे. हा पाणीसाठा वर्षीच्या तुलनेत कमी आहे. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105 टीएमसी आहे.

मोठ्या पावसाची गरज

पावसाळ्याच्या सुरुवातीला कोयना धरणाच्या पाणी साठ्याने निचांकी पातळी गाठली होती. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असणाऱ्या संततधार पावसाने कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. सध्या पडणारा पाऊस हा धरण भरण्यासाठी पुरेसा नाही. कोयना धरणं भरण्यासाठी अजूनही मोठ्या पावसाची गरज आहे.

Non Stop LIVE Update
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.